भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत

गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे. 

Updated: Aug 2, 2017, 09:14 AM IST
भारत-श्रीलंका दुसरी कसोटी कोलंबोत title=

कोलंबो : गॉल टेस्टमध्ये यजमान श्रीलंकेला धुळ चारल्यानंतर आता दुसऱ्या कोलंबो टेस्टमध्ये विजयश्री मिळवण्यासाठी टीम इंडिया अर्थात विराट कोहलची सेना सज्ज आहे. 

भारतानं सांघिक कामगिरीच्या जोरावर पहिली टेस्ट जिंकली. तर लंका टीमला सीरिजमध्ये कमबॅक करण्यासाठी भारतीय टीमला रोखण्याचं मोठ आव्हान असेल. 

कोलंबो टेस्टमध्ये कोहली अँड कंपनी श्रीलंकेला पराभूत करण्याच्या उद्देशानचं मैदानात उतणार आहे. पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंनी मैदानावर शंभर टक्के परफॉर्मन्स दाखवलाआणि लंकन टीमला पराभूत केलं.

बॅटिंग, बॉलिंग आणि फिल्डिंग अशा तिन्ही आघाड्यांवर भारतीय टीम श्रीलंकेवर भारी पडली. मात्र, असे असले तरी विराटची टीम निवड करताना खरी कसोटी लागणार आहे. उद्यापासून कोलंबोत दुसऱ्या कसोटी सामन्याला सकाळी १० वाजता सुरु होईल.