23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे

Shahrukh Khan : वयाच्या 23 व्या वर्षी 'या' अभिनेत्रीनं टाकलं शाहरुख खानला मागे...

दिक्षा पाटील | Updated: Jan 23, 2025, 05:49 PM IST
23 वर्षीय अभिनेत्रीने केली कमाल, 'या' बाबतीत शाहरुख खानला टाकलं मागे title=
(Photo Credit : Social Media)

Jannat Zubair Shahrukh Khan : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खानची लोकप्रियता फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते नेहमीच विविध व्हिडीओ शेअर करताना दिसतात. सोशल मीडियावर त्याचे लाखो चाहते असले तरी त्याच्या लोकप्रियतेला एका 23 वर्षांच्या अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं मागे टाकलं आहे. चला तर जाणून घेऊया कोण आहे ती 23 वर्षांची ती अभिनेत्री? 

सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरनं जन्नत जुबैरनं इन्स्टाग्राम फॉलोवर्सच्या बाबतीत बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख शाहरुख खानला मागे टाकत मोठी लोकप्रियता मिळाली आहे. जन्नत जुबैरची वाढती लोकप्रियता डिजिटल क्रिएटर्सच्या वाढत्या प्रभावामुळे दिसत आहे. इन्स्टाग्रावर जिथे शाहरुख खानच्या 47.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. तर जन्नतचे 49.7 मिलियन फॉलोवर्स आहेत. या दोघांच्या फॉलोवर्समध्ये 2 मिलियनपेक्षा जास्त फॉलोवर्स आहेत अर्थातच जन्नतही 2 मिलियन फॉलोवर्सनं शाहरुखच्या पुढे आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

जन्नतविषयी बोलायचं झालं तर लोकप्रिय भारतीय अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे. जन्नत जुबेरनं वयाच्या 21 व्या वर्षी मुंबईमध्ये स्वत: चं हक्काच घर खरेदी केलं आहे. जन्नत फक्त अभिनयचं करत नाही तर बिझनेसवूमन देखील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तिची एकूण संपत्ती 250 कोटींची संपत्ती आहे. यामुळे तिची संपत्ती ही कोणत्याही बॉलिवूड सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आणि ते देखील इतक्या कमी वयात. 

हेही वाचा : 'मुलींनी स्वत: निर्णय घ्यायला हवे'; लोकप्रिय मराठमोळ्या अभिनेत्रीचं महिला सशक्तीकरणावर वक्तव्य

तिच्या करिअर विषयी बोलायचं झालं तर 'फुलवा' आणि 'तू आशिकी' सारख्या शोमध्ये बाल कलाकाराची भूमिका साकारली होती. ती सोशल मीडियावर जो काही कॉन्टेट शेअर करत त्यामुळे तिला लोकप्रियता मिळाली आहे. त्याशिवाय ती 'खतरों के खिलाडी 12' मध्ये देखील दिसली. जन्नत जुबैर सगळ्यात शेवटी 'लाफ्टर शेफ्स अनलिमिटेड एंटरटेनमेंट' च्या पहिल्या सीझनमध्ये दिसली होती. याशिवाय जन्नतनं बॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे. राणी मुखर्जीच्या ‘हिचकी’ या चित्रपटात देखील काम केलं आहे. चित्रपटात जन्नतनं विद्यार्थीनीची भूमिका साकारली होती.