Rinku Singh On Rahul Dravid : भारत आणि साऊथ अफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील टी-ट्वेंटी मालिकेला आजपासून सुरूवात होत आहे. सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत डरबनच्या मैदानात पहिला सामना खेळवला जाईल. ऑस्ट्रेलियाचा पराभव केलेल्यानंतर आता साऊथ अफ्रिकेला धुळ चारण्यासाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. अशातच आता टीम इंडियाचा मिडल ऑर्डर खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) याने सामन्याआधी मोठं वक्तव्य केलं आहे. रिंकू सिंहने सामना सुरू होण्याआधी राहुल द्रविड (Rahul Dravid) यांचे आभार मानले आहेत. नेमकं काय म्हणाला रिंकू सिंह? पाहुया...
काय म्हणाला Rinku Singh ?
भारतीय खेळपट्ट्यांपेक्षा आफ्रिकन खेळपट्ट्यांवर जास्त उसळी असल्याचं रिंकू सिंह याने म्हटलं आहे. गोलंदाजांना मिळणारा अतिरिक्त वेग आणि बॉऊंसर लक्षात घेता अतिरिक्त प्रयत्न आणि सराव आवश्यक करण्य़ाची गरज असल्याचं मत देखील त्याने यावेळी व्यक्त केलं आहे. मी जेव्हा येथे फलंदाजी केली तेव्हा भारतीय विकेट्सपेक्षा जास्त बॉऊंसर येतो, त्यामुळे सरावाशिवाय तुम्हाला पर्याय नाही, असा अनुभव रिंकू सिंह याने सांगितला आहे.
राहुल द्रविड यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. त्यांनी मला माझा नॅचरल खेळ करण्यास सांगितलं आहे. पहिल्या सेशनमध्ये मला खूप मजा आली. कारण हवामान चांगलं होतं. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणं म्हणजे एक खास अनुभव असतो. त्यांनी मला आधीच सांगितलंय की, तू फक्त स्वत:वर विश्वास ठेव आणि तुझ्या अंदाज फलंदाजी करत रहा, असं रिंकू सिंह याने सांगितलं आहे.
मी 2013 पासून उत्तर प्रदेशसाठी पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर खेळत आहे. त्यामुळे मला त्याची सवय झाली आहे. चार-पाच विकेट पडल्यानंतर या क्रमाने खेळणे अवघड आहे, पण माझा स्वत:वर विश्वास आहे. मी जितका संयमाने खेळेन तितके चांगले खेळू शकेन, असंही रिंकूने सांगितलं आहे.
दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताचा टी-20 संघ
यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रवि बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, मो. सिराज, मुकेश कुमार, दीपक चाहर.
भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याचं वेळापत्रक