IND vs NZ: टीम इंडिया की न्यूझीलंड कोण जिंकणार? काय सांगतात Head to Head रेकॉर्ड

IND vs NZ Head to Head: रोहितचा मास्टरप्लॅन यशस्वी ठरणार? टीम इंडिया किवीवर भारी पडणार का? काय सांगतात हेड टू हेड अंदाज

Updated: Nov 17, 2021, 06:37 PM IST
IND vs NZ: टीम इंडिया की न्यूझीलंड कोण जिंकणार? काय सांगतात Head to Head रेकॉर्ड title=

मुंबई: भारत विरुद्ध न्यूझीलंड आज टी 20 पहिला सामना होणार आहे. घरच्या मैदानावर जयपूर इथे सवाई मानसिंह स्टेडियमवर संध्याकाळी 7.00 वाजता हा सामना खेळवण्यात येणार आहे. 6.30 वाजता टॉस होणार आहे. टी 20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाची कामगिरी अत्यंत वाईट राहिली आहे. 

टी 20 सीरिजचं नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. त्यामुळे या सीरिजकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. रोहित आणि राहुल द्रविड यांचं पर्व आजपासून सुरू होत आहे. न्यूझीलंड संघ टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यातील चुका सुधारून पुन्हा एकदा दणक्यात मैदानात उतरताना दिसेल.

या सीरिजमध्ये माजी कर्णधार विराट कोहलीला आराम देण्यात आला आहे. कोहली, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर शार्दुल ठाकूर, राहुल चहर आणि वरुण चक्रवर्ती यांना या सीरिजसाठी स्थान देण्यात आलं नाही. 

काय सांगतात हेड टू हेड रेकॉर्ड

एकूण सामने भारत विरुद्ध न्यूझीलंड- 18
भारताने जिंकलेले सामने- 8, टीम इंडियाने गमवलेले सामने- 9
न्यूझीलंड संघाने जिंकलेले सामने- 9, गमवलेले सामने- 8 

जो टॉस जिंकतो ते मॅच जिंकतो?

टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाहिलं असेल की अफगाणिस्तान संघ वगळता जेवढे संघ टॉस जिंकले तेवढे संघ सामनाही जिंकले आहेत. त्यामुळे टॉस फॅक्टर देखील आजच्या सामन्यात महत्त्वाचा असणार आहे. टॉस जिंकणारे संघ टी 20 वर्ल्ड कपच्या स्पर्धेत सामना जिंकल्याने आता न्यूझीलंड सीरिज विरुद्ध रोहितच नशीब साथ देणार का? हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

टीम इंडिया संभाव्य Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.

न्यूझीलंड टीम संभाव्य Playing XI

मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, जेम्स नीशम, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेन्ट बोल्ट.

टीम इंडिया स्क्वाड

रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीप), के एल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन, व्यंकटेश अय्यर ऋतुराज गायकवाड.

न्यूझीलंड स्क्वाड

 टिम साउथी (कर्णधार), टिम सीफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने.