IND vs NZ 2nd T 20I | रोहित शर्मा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा करण्याची संधी

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs New Zealand 2nd t 20 match) दुसरा सामना आज (19 नोव्हेंबर) रांचीत खेळवण्यात येणार आहे.  

Updated: Nov 19, 2021, 03:45 PM IST
IND vs NZ 2nd T 20I | रोहित शर्मा इतिहास रचण्यापासून एक पाऊल दूर, न्यूझीलंड विरुद्ध हा कारनामा करण्याची संधी title=

रांची : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील टी 20 मालिकेतील (india vs New zealand 2nd t 20 match) दुसरा सामना आज (19 नोव्हेंबर)  रांचीत खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला संध्याकाळी 7 वाजता झारखंड क्रिकेट स्टेडियमध्ये (Jharkhand State Cricket Association Stadium) खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे हा सामना जिंकून टीम इंडियाला ही मालिका जिंकण्याची संधी आहे. तर दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडसमोर मालिकेतील आव्हान कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. दरम्यान या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) मोठा पराक्रम करण्याची संधी आहे. रोहितने ही कामगिरी केल्यास, तो पहिलाच भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे. रोहित व्यतिरिक्त या यादीत आसपास दुसरा भारतीय नाही. (india vs New zealand 2nd t 20 match rohit sharma needed to 1 six for completed 450 sixes in across all format)

काय आहे रेकॉर्ड?

रोहितला न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यात 450 सिक्सचा टप्पा पूर्ण करण्याची संधी आहे. रोहितने आतापर्यंत कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये मिळून एकूण 449 सिक्स मारले आहेत. त्यामुळे रोहितने आणखी एक सिक्स मारल्यास तो असा भीमपराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरेल.

अव्वल स्थानी कोण?

वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ असलेला ख्रिस गेल आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सिक्सच्या यादीत अव्वल स्थानी आहे. गेलने आतापर्यंत एकूण 553 सिक्स खेचले आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे. आफ्रिदीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 476 खणखणीत सिक्स खेचले आहेत. तर त्यानंतर रोहितचा क्रमांक आहे.   

सर्वाधिक सिक्स मारणारे टॉप 3 बॅट्समन 

ख्रिस गेल - 553 सिक्स 
शाहिद आफ्रिदी -  476 सिक्स 
रोहित शर्मा - 449 सिक्स

रोहित शर्माने जयपूरमध्ये झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 48 धावांची खेळी केली होती. रोहितचं अर्धशतक अवघ्या 2 धावांनी हुकलं होतं. त्यामुळे या दुसऱ्या सामन्यात रोहितकडून अशाच हिट कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तसंच हा सामना जिंकला तर रोहित कर्णधार म्हणून पहिलीच टी 20 मालिकाही जिंकण्याची कारनामा करेल.

टीम इंडियाला पराभवाचा वचपा घेण्याची संधी

रांचीच्या या मैदानात उभयसंघ दुसऱ्यांदा आमनेसामने खेळत आहेत. याआधी दोन्ही टीम 16 ऑक्टोबर 2016 रोजी एकदिवसीय सामना खेळले होते. या सामन्यात न्यूझीलंडने टीम इंडियाचा 19 धावांनी पराभव केला होता.

त्यामुळे टीम इंडियाला या मैदानावरील 5 वर्षांपूर्वीच्या पराभवाचा वचपा घेण्याचीही संधी आहे. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने निर्णायक असलेल्या या दुसऱ्या सामन्याच्या निकालाकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.