T20 WC Semi Final Dates: T20 वर्ल्डकपमध्ये भारतीय टीमचा (Team India) जलवा कायम आहे. सुपर-12 फेरीमध्ये शेवटच्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा (zimbabwe) सुपडा साफ करत ग्रुप-2 मध्ये टॉपचं स्थान पटकावलं. भारतासोबतच पाकिस्तानने ग्रुप2 मधून सेमीफायनलमध्ये (Semifinal) धडक मारलीये. त्यामुळे आता सेमीफायलनमध्ये कोणती टीम कोणाशी सामना करणार आहे स्पष्ट झालंय.
त्यामुळे आता टीम इंडियाला सेमीफायनलच्या सामन्यात इंग्लंडचा सामना करावा लागणार आहे. 10 नोव्हेंबरला एडलेडच्या मैदानावर दोन्ही टीम आमनेसामने येणार आहे. म्हणजेच टीम इंडियासाठी वर्ल्डकप आता केवळ दोन पावलं दूर आहे. भारताला सेमीफायनल आणि अंतिम फेरीत विजय मिळवायचा आहे. जर हा विजय मिळाला तर 15 वर्षांनंतर टी-20 वर्ल्डकपची ट्रॉफी भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या हातात असेल.
झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यापूर्वीच टीम इंडिया सेमीफायनमध्ये पोहोचली होती. मात्र ग्रुप 2 मध्ये अव्वल राहण्यासाठी विजय हा गरजेचा होता. त्यामुळे भारताचा ग्रुप 1 मधील मध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या टीमशी सामना होईल. त्यानुसार आता भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाची (Team India) सुरूवात चांगली झाली. मात्र, कॅप्टन रोहित शर्मा (Rohit Sharma) लवकर बाद झाला. विराट आणि रोहितने जबाबदारीने खेळत झिम्बाब्वेचं रान उठवलं. जोरदार फटकेबाजी करत राहूलने अर्धशतक साजरं केलं. तर त्यानंतर आलेल्या सुर्यकुमारने (Suryakumar) देखील धमाकेदार अंदाजात 25 चेंडूत 61 धावा केल्या. यावेळी त्यानं 6 चौकार तर 4 षटकार खेचले.
टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची सुरूवात चांगली झाली नाही. सलामीवीर वेसली माधवेरे पहिल्याच बॉलवर बाद झाला. तर रेजिस चकाबवा याला देखील भोपळा फोडता आला नाही. कालांतराने झिम्बाब्वेची फलंदाजी ढासळत गेली. अखेरच्या 4 षटकात झिम्बाब्वेला 80 धावांची गरज होती. मात्र, अखेर झिम्बाब्वेचा 71 धावांनी पराभव झाला आहे.