IND vs AUS, 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs Aus) यांच्यात नागपुरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानात (VCA Cricket Stadium) खेळवल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (India vs Australia 1st Test) भारताने दमदार विजयाची नोंद केली. भारताने सामना 1 डाव आणि 132 धावांच्या फरकाने जिंकत मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे. या खेळामध्ये भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 डावाने विजय मिळवला आहे. यामध्ये भारतीय संघाचा अनुभवी स्टार फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (R Ashwin India vs Australia) नागपूर कसोटी सामन्यात मोठी कामगिरी केली आहे.
ऑस्ट्रेलियाला 177 धावांत सर्वबाद करुन भारताने पहिल्या डावात 400 धावा करत 223 धावांची आघाडी घेतली. ज्यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव केवळ 91 धावांत आटोपत सामना 1 डाव आणि 132 धावांनी जिंकला आहे. भारताकडून रवींद्र जाडेजाने दोन्ही डावात मिळून 7 तर अश्विननं दोन्ही डावांत मिळून 8 विकेट्स घेतल्या. याशिवाय कॅप्टन रोहित शर्माने (Rohit Sharma) 120 तर अक्षर पटेल 84 आणि रवींद्र जाडेजा 70 यांनी सर्वाधिक धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा युवा फिरकीपटू टॉड मर्फीने एका डावातच 7 विकेट्स घेत चांगली कामगिरी केली पण अखेर सामना भारतानं मोठ्या फरकाने जिंकला आहे.
वाचा: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय
रविचंद्रन अश्विन हा कसोटी प्रकारातील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. आर अश्विनच्या गोलंदाजीची जादू ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या नागपूर कसोटी सामन्यातही पाहायला मिळाली. या सामन्याच्या दुसऱ्या डावात त्याने शानदार गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन फलंदाजी उद्ध्वस्त केली. या खेळीदरम्यान त्याने एक मोठा विक्रमही आपल्या नावावर केला. रविचंद्रन अश्विनने या सामन्याच्या पहिल्या डावात 15.5 षटके टाकत 3 बळी घेतले. पण दुसऱ्या डावात आर अश्विन आणखीनच मारक दिसला आणि सुरुवातीच्या 7 विकेट्सपैकी 5 विकेट घेतल्या. या इनिंगमध्ये त्याने 5 विकेट पूर्ण करताच अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाची बरोबरी केली.
आर अश्विनने भारताकडून 25 व्यांदा एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी केवळ अनिल कुंबळेने भारतात खेळताना 25 डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम केला होता. त्याचवेळी, आर अश्विनने 31व्यांदा कसोटीच्या एका डावात 5 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत.