Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय

India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता.  भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1 - 0 अशी आघाडी घेतली. 

Updated: Feb 11, 2023, 03:33 PM IST
Ind vs Aus Nagpur Test: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 धावांनी विजय  title=

India vs Australia 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील नागपूर कसोटीचा आज तिसरा दिवस होता. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 132 धावांनी पराभव करत 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा डाव 91 धावातच संपुष्टात आला. 

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केलेल्या कांगारूंचा पहिला डाव 177 धावात संपवला. त्यानंतर आपल्या पहिल्या डावात 400 धावांचा डोंगर उभारत पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली.  रवींद्र जडेजा, आर अश्विन  यांच्या फिरकीसमोर ऑसी फलंदाज फ्लॉप ठरला. तर दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी सुरूच राहिली आणि भारताने अडीच दिवसांत कसोटी जिंकली. भारताने 1 डाव व 132 धावांनी विजय मिळवताना मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.फलंदाजीत बोलायचे झाले तर रोहित शर्माने सर्वाधिक 120 धावा तर अक्षर पटेलने 84 आणि रविंद्र जडेजाने 70 धावांचे योगदान दिले.

वाचा: पाहुण्यांना गुंडाळलं! भारतीय फिरकीपटूंच्या जोरावर भारताचा 132 डावाने विजय

तसेच जडेजा व पटेल यांनी आठव्या विकेटसाठी 211 चेंडूंत 88 धावा जोडल्या. त्यानंतर मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना धू धू धुतले आणि नवव्या विकेटसाठी पटेलसह 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. शमीने 47 चेंडूंत 2 चौकार व 3 षटकारांसह 37 धावा केल्या. अक्षर पटेल 174 चेंडूंत 10 चौकार व 1 षटकारासह 84 धावांवर बाद झाला आणि भारताचा डाव 400 धावांवर आटोपला. भारताने पहिल्या डावात 223 धावांची आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाचा पदार्पणवीर टॉड मर्फीने 124 धावा देताना 7 विकेट्स घेतल्या.  

दुसऱ्या डावातही ऑस्ट्रेलियाची पडझड सुरूच राहिली. त्यानंतर रवींद्र अश्विनने कसोटीतील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेनला पायचीत केले. अश्विन आणि डेव्हिड वॉर्नर यांच्यात पुन्हा एकदा भारतीय फिरकीपटूने बाजी मारली. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अश्विन (97) दुसऱ्या स्थानावर आला.