LIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला. 

Updated: Sep 3, 2017, 06:43 PM IST
LIVE : भारताला विजयासाठी २३९ धावांची आवश्यकता title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडेत भारतासमोर विजयासाठी २३९ धावांचे आव्हान आहे. भारताच्या तिखट माऱ्यासमोर श्रीलंकेचा संघ २३८ धावांत संपुष्टात आला. 

संपूर्ण लाईव्ह स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

भुवनेश्वर कुमारच्या ५ विकेट, जसप्रीत बुमराहच्या २ आणि कुलदीप यादव आणि युझवेंद्र चहल यांच्या प्रत्येकी एक विकेटमुळे श्रीलंकेला केवळ २३८ धावा करता आल्या.

थिरिमने याने सर्वाधिक ६७ धावा केल्या. तर अँजेलो मॅथ्यूजने ५५ धावा केल्या. सलामीवीर उपुल थरंगाने ४८ धावांची खेळी केली. याव्यतिरिक्त श्रीलंकेचे इतर सर्व फलंदाज फ्लॉप ठरले. 

पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत भारताने ४-० अशी आघाडी घेतलीये त्यामुळे हा सामना जिंकत श्रीलंकेला वनडेतही व्हाईटवॉश देण्याचा भारत प्रयत्न करेल.