श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीची स्टंपिंगची सेंच्युरी पूर्ण

श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रेकॉर्ड केलाय. वनडे क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर १०० स्टंपिंग झालेत.

Updated: Sep 3, 2017, 06:28 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात धोनीची स्टंपिंगची सेंच्युरी पूर्ण  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने रेकॉर्ड केलाय. वनडे क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर १०० स्टंपिंग झालेत.

वनडेमध्ये सर्वाधिक स्टंपिंग करणारा धोनी पहिला विकेटकीपर ठरलाय. श्रीलंकेच्या कुमार संगकाराच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये ९९ स्टम्पिंग आहेत.

श्रीलंकेच्या धनंजयाची विकेट घेत त्याने आपल्या स्टंपिंगची सेंच्युरी पूर्ण केली. भारताविरुद्धच्या पाचव्या वनडे सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना नऊ गड्यांच्या मोबदल्यात सव्वादोनशेचा टप्पा गाठलाय.