मुंबई : भारत- दक्षिण आफ्रिकेत T20 मालिका खेळवली जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ युवा खेळाडूंना घेऊन मैदानात उतरणार आहे. त्यात दक्षिण आफ्रिका संघही एक मजबूत संघासह मैदानात उतरणार आहे. या संघातील तीन खेळाडू भारतीय खेळाडूंवर भारी पडण्याची शक्यता आहे.
टेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेचा T20 संघ 9 ते 19 जून दरम्यान भारताविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळणार आहे. या सामन्यात भारताने त्यांचे प्रमुख खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली असून केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे आणि ऋषभ पंत उपकर्णधार आहे. तर इतर सर्व युवा खेळाडू आहेत.
दक्षिण आफ्रिकेचा मजबूत संघ
दक्षिण आफ्रिकेकडे यष्टिरक्षक क्विंटन डी कॉक आणि वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा, मार्को जॅन्सेन, एनरिक नॉर्खिया, ड्वेन प्रिटोरियस, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर असे अनुभवी खेळाडू आहेत. यातील अनेक खेळाडूंनी आयपीएल खेळली आहे, त्यामुळे भारतीय मैदानाबद्दल त्यांना चांगली माहिती आहे. याचा दक्षिण आफ्रिकेला चांगला फायदा होणार आहे.
विक्रम मोडणार का ?
टीम इंडियाला आजपर्यंत कधीही आफ्रिकन संघाला घरच्या मैदानावर पराभूत करता आलेले नाही, त्यामुळे यंदा केएल राहुलचा संघ विक्रम मोडतो हे पहावे लागेल.