IND vs NZ: शाहरूखच्या टीमचा धडाकेबाज फलंदाज करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण

शाहरूख खानच्या टीममधून खेळणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाला टीम इंडियाकडून टी 20 सीरिजसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळणार संधी?

Updated: Nov 17, 2021, 07:03 PM IST
IND vs NZ: शाहरूखच्या टीमचा धडाकेबाज फलंदाज करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण title=

मुंबई: न्यूझीलंड विरुद्ध टीम इंडिया आज जयपूरमध्ये पहिला टी 20 सामना होणार आहे. रोहित शर्मा या टी 20 सीरिजचं नेतृत्व करणार आहे. 6.30 वाजता टॉस होणार असून संध्याकाळी 7.00 वाजता जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियमवर ह्या सामन्याला सुरुवात होणार आहे. 

IPL मध्ये शाहरूख खानच्या संघाकडून खेळणाऱ्या धडाकेबाज फलंदाजाला या सीरिजमध्ये संधी देण्यात आली आहे. कर्णधार रोहित शर्मा आज प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला खेळण्याची संधी देणार का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. आतापर्यंत राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देण्यात आलेल्या व्यंकटेशनं आता टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. टीम इंडियाच्या स्क्वाडमध्ये त्याची निवड कऱण्यात आली आहे. 

बीसीसीआयने ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये व्यंकटेश अय्यर म्हणाला की, 'मी गेल्या काही काळापासून देशांतर्गत क्रिकेट खोळतोय. यामध्ये माझी प्रगती झाली आणि त्याचं मला फळही मिळालं. मी केवळ हे स्वप्न देशासाठी पाहिलं नाही तर टीम इंडियाला जिंकवण्यासाठी पाहिलं आहे. 

 वेंकटेश अय्यरने IPL 2021 च्या UAE लीगमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) साठी दमदार कामगिरी केली. अय्यरने फर्स्ट क्लास 10 सामने खेळून 545 धावा केल्या आहेत. लिस्ट A 24 सामने खेळून त्याने 849 धावा केल्या आहेत. T20 मध्ये 53 सामने खेळून 1249 धावा केल्या आहेत. 

टीम इंडिया संभाव्य Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.

न्यूझीलंड टीम संभाव्य Playing XI

मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, जेम्स नीशम, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेन्ट बोल्ट.