जयपूर : टीम इंडियाचा अनुभवी सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला नुकतेच टी-२० संघाचा कायमस्वरूपी कर्णधार बनवण्यात आले आहे. रोहित कर्णधार झाल्यानंतर दीर्घकाळ संघाबाहेर बसलेल्या काही खेळाडूंच्या टीममध्ये पुनरागमनाची आशा निर्माण झाल्या आहेत, याच एक नाव जादूई फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचे देखील आहे. एकेकाळी संघाची सर्वात मोठी ताकद मानल्या जाणाऱ्या या फिरकीपटूला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. मात्र या खेळाडूला रोहितच्या नेतृत्वाखाली संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
2021 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी निवडलेल्या टीममध्ये कुलदीप यादवचा समावेश नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 आणि कसोटी मालिकेतही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. कुलदीप यादवने टीम इंडियासाठी 23 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 14.21 च्या सरासरीने आणि 7.15 च्या उत्कृष्ट इकॉनॉमी रेटने 41 विकेट्स घेतल्या आहेत.
त्याचा सर्वोत्तम गोलंदाजी आकडा 5/24 होता, जो त्याने 2018 मध्ये इंग्लंडविरुद्ध मँचेस्टरमध्ये गाठला होता. पण हा शानदार फिरकीपटू आता संघात स्थान मिळवण्यात सतत अपयशी ठरत आहे.
गुडघ्याच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर कुलदीप यादवने फिटनेससाठी पुन्हा सराव सुरू केला आहे. दुखापतीमुळे तो आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातून बाहेर पडला होता आणि आता तो भारतीय संघात परतण्याच्या तयारीत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचे (केकेआर) प्रतिनिधित्व करणाऱ्या कुलदीपला सरावादरम्यान गुडघ्याला दुखापत झाल्याने यंदाच्या आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात यूएईमधून मायदेशी परतावे लागले होते.
आता रोहित शर्मा T20 संघाचा कर्णधार झाला आहे. अशा परिस्थितीत आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली कुलदीप यादव पुन्हा संघात पुनरागमन करेल, अशी आशा आहे. कुलदीपचे रोहितशीही चांगले संबंध आहेत आणि रोहितने संघात परतण्यासाठी त्याला पाठिंबा द्यावा अशी त्याची इच्छा आहे. अशा परिस्थितीत आता फक्त रोहितचे कर्णधारपद कुलदीपची कारकीर्द संपण्यापासून वाचवू शकते.
कुलदीप यादवने 22 टी-20 सामन्यात 41 विकेट घेतल्या आहेत. त्याने 45 आयपीएल सामने देखील खेळले आहेत ज्यात त्याने 40 विकेट घेतल्या आहेत. कुलदीपची वनडे कारकीर्दही चमकदार राहिली आहे. त्याने 65 एकदिवसीय सामन्यांमध्ये 107 विकेट घेतल्या आहेत. हे आकडे कुलदीप यादवच्या प्रतिभेचे आकलन करण्यासाठी पुरेसे आहेत. टी-20 फॉरमॅटमध्ये त्याचा इकॉनॉमी रेटही 8 पेक्षा कमी आहे.
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, आर अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल.
मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, टिम सीफर्ट, ग्लेन फिलिप्स (विकेटकीपर), मार्क चॅपमन, मिचेल सॅन्टनर, जेम्स नीशम, टिम साउथी (कर्णधार), लॉकी फर्ग्युसन, ईश सोधी, ट्रेन्ट बोल्ट.
रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीप), के एल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल, आर अश्विन, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, इशान किशन, व्यंकटेश अय्यर ऋतुराज गायकवाड.
टिम साउथी (कर्णधार), टिम सीफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, जेम्स नीशम, मिचेल सॅन्टनर, लॉकी फर्ग्युसन, काइल जेमिसन, ट्रेंट बोल्ट, ईश सोधी, टॉड अॅस्टल, अॅडम मिल्ने.