कोलकाता | ईडन गार्डनमध्ये टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील तिसऱ्या टी 20 सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. टीम इंडियाने 3 सामन्यांची ही मालिका आधीच जिंकलेली आहे. टीम इंडियाने या मालिकेत 2-0 ने आघाडीवर आहे. त्यामुळे या सामन्यात युवा खेळाडूंना संधी देण्यात येणार असल्याची चर्चाही आहे. या सामन्यात टीम इंडियाचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीचा मोठा विक्रम मोडित काढण्याची संधी आहे. (ind vs nz 3rd t 20i team india captain rohit sharma has need to 87 runs for break virat kohli most t 20i runs record by indian batsman)
काय आहे रेकॉर्ड?
रोहितला विराटचा टी 20 मधील टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. रोहितला या रेकॉर्डसाठी 87 धावांची गरज आहे. विराटने टी 20 मध्ये 95 सामन्यांमधील 87 डावात 3 हजार 227 धावा केल्या आहेत. तर रोहितच्या नावे 118 मॅचेसमध्ये 110 इनिंग्समध्ये 3 हजार 141 रन्स आहेत. त्यामुळे रोहितला कर्णधार होताच विराटचा हा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी आहे. तसेच रोहित या मालिकेत तुफान फॉर्मात आहे.
रोहितने या मालिकेतील पहिल्या आणि दुसऱ्या सामन्यात अनुक्रमे 48 आणि 55 धावा केल्या आहेत. यामुळे रोहित विराटचा सर्वाधिक धावांचा विक्रम मोडित काढेल, अशी अपेक्षा रोहितच्या चाहत्यांना आहे. यामुळे रोहित हा कारनामा करतो का, याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे.
टीम इंडिया | रोहित शर्मा (कर्णधार), रिषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, आवेश खान, ईशान खान आणि ऋतुराज गायकवाड.
न्यूझीलंड क्रिकेट टीम | टीम साऊथी (कॅप्टन), टीम सायफर्ट (विकेटकीपर), मार्टिन गुप्टील, डेरेल मिचेल, ग्लेन फिलीप्स, रचीन रवींद्र, मिचेल सँटनर, टोड एस्टेल, लॉकी फर्गुयसन, ट्रेन्ट बोल्ट, एडम मिल्ने, इश सोढी आणि जेम्स निशाम.