मुंबई: आयपीएलमधील मेगा ऑक्शनच्या तारखा अद्याप जाहीर झाल्या नाहीत. मात्र येत्या 15 व्या हंगामात 10 संघांमध्ये आयपीएल खेळवण्यात येणार आहे. दोन नवे संघ 15 व्या हंगामात खेळण्यासाठी उतरणार आहेत.
माजी क्रिकेटर आणि कॉमेंटेटर आकाश चोप्रा यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. आकाश चोप्रा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार धडाकेबाज खेळाडूवर 20 कोटींपर्यंत बोली लागू शकते.
आयपीएलमध्ये पुन्हा एकदा मोठी बोली लागणार आहे. त्याआधी काही क्रिकेटर्सना प्रत्येक संघ रिटेन करेल. अहमदाबाद, लखनऊ या दोन नव्या संघांसाठी चांगले खेळाडू निवडायचे आहेत. त्यामुळे आता ही बोली किती मोठी लागणार याकडे देखील सर्वांचं लक्ष असणार आहे.
आयपीएल 15 व्या मोसमात दोन संघ समाविष्ट होणार आहेत. त्यामुळे बीसीसीायने मेगा ऑक्शनचं आयोजन केलंय. त्यामुळे सर्व काही नव्याने होत असल्याने भारतीय आणि विदेशी खेळाडू रिटेन करण्याच्या नियमातही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध कमेंटेटर आकाश चोप्रा यांनी IPL मेगा ऑक्शनबाबत मोठी भविष्यवाणी केली. त्याने ट्विट केले की, 'जर के एल राहुल मेगा ऑक्शनमध्ये गेला आणि जर एखाद्या खेळाडूचा पगार ड्राफ्ट सिस्टममध्ये निश्चित केला गेला नाही.
केएल राहुल मेगा ऑक्शनमध्ये सर्वात महागडा खेळाडू असेल. के एल राहुलवर 20 कोटी किंवा त्याहून अधिक किंमत बोली लागू शकते. अशी भविष्यवाणी आकाश चोप्रा यांनी केली आहे.
पंजाब संघाकडून खेळणाऱ्या के एल राहुलने यावेळी आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. त्याच्या वेगवान फलंदाजीमुळे सर्व गोलंदाज त्याच्यावर धाकधूक आहेत. राहुल कर्णधारपदाची जबाबदारीही सांभाळू शकतो, त्यामुळे लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन फ्रँचायझी आयपीएल मेगा लिलावात त्याचा समावेश करू शकतात.
आयपीएल 2021 मध्ये के एल राहुलने 13 सामन्यांमध्ये 626 ज्यामध्ये 6 अर्धशतकांचा समावेश आहे. के एल राहुलने आयपीएलमध्ये एकूण 94 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 3273 धावा केल्या आहेत.
If KL Rahul ends up in the auction…and if the draft system doesn’t put a ceiling on a player’s salary…he will easily be the most expensive player in the upcoming auction. 20 Crore +.
— Aakash Chopra (@cricketaakash) November 19, 2021