Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट

 भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test)  सुरु आहे. तिसऱ्या दिवस अखेर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट झाली आहे. 

Updated: Jan 9, 2021, 01:55 PM IST
Ind vs Aus: तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट    title=
(Source: Twitter/ICC)

सिडनी : भारत (India) आणि ऑस्ट्रेलिया (Australia') यांच्यात तिसरा कसोटी सामना (IND vs AUS 3rd Test)  सुरु आहे. तिसऱ्या दिवस अखेर सिडनी कसोटीत ऑस्ट्रेलियाची स्थिती बळकट झाली आहे. भारताचा डाव स्वस्तात आटोपल्यावर ऑस्ट्रेलियाच्या दिवस अखेर 2 बाद 103 धावा करत 197 धावांची आघाडी घेतली आहे. (Australia's total to 103/2 in second innings)

India vs Australia 3rd Test या कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३३८ धावांचा आवाहनाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव तिसऱ्या दिवशी २४४ धावांवर रोखला. त्यानंतर दुसऱ्या डावांत ऑस्ट्रेलियाने दोन गड्यांच्या मोबदल्यात 103 धावा केल्या आहेत. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने 197 धावांची आघाडी घेतली आहे.

 वॉर्नर आणि फुकोव्हकी यांना बाद करत भारताने ऑस्ट्रलियाला दोन झटके दिले. मात्र, तिसऱ्या दिवसाखेर लाबुशेन आणि स्मिथ यांनी चांगली खेळी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लाबुशेन 47 तर स्मिथ 29 धावांवर नाबाद होते. भारताकडून सिराज आणि अश्विन यांनी प्रत्येकी एक एक बळी घेतला.

दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाल्यानंतर भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे लगेच बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचा डाव कोसळला. चांगल्या सुरुवातीनंतरही फलंदाजांनी केलेल्या हराकिरीमुळे भारतीय संघाचा पहिला डाव 244 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजारा (50) आणि शुबमन गिल (50) यांचा अपवाद वगळता एकाही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. रोहित शर्मा (26), अजिंक्य रहाणे (22) आणि ऋषभ पंत (36) यांना चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले. दरम्यान, रवींद्र जाडेजाने चांगला प्रयत्न केला. जाडेजाने नाबाद 28 धावांची खेळी केली.