IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या

Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते. 

Updated: Feb 8, 2023, 09:42 PM IST
IND vs AUS: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना कधी, कुठे पाहता येणार? जाणून घ्या title=

Border Gavaskar Trophy India vs Australia : टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात बॉर्डर गावस्कर ट्रॉफीची (Border Gavaskar Trophy) स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 4 टेस्ट सामने खेळवले जाणार आहेत. यामध्ये बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना उद्या गुरुवार, 9 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार आहे, हे जाणून घेऊयात. 

 

हे ही वाचा : शुबमन गिल की सुर्यकुमार यादव? रोहित शर्मा म्हणाला, 'या' खेळाडूला देणार संधी 

 

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) या दोन्ही संघासाठी ही स्पर्धा खुप महत्वाची आहे. कारण या स्पर्धेचा निकाल दोन्ही संघाना वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनच्या फायनलमध्ये पोहोचवणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसून सराव करत होते. आता पहिल्या सामन्यात दोन्ही संघ कसे खेळतात, हे पाहावे लागणार आहे. 

सामन्याची वेळ

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात 9 फेब्रुवारीला होणारा पहिला कसोटी सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना गुरुवारी सकाळी ठीक 9.30 वाजता सुरू होईल. तर या सामन्याचे नाणेफेक 9 वाजता होणार आहे.

सामन्याचे थेट प्रक्षेपण

या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर 9 फेब्रुवारीला सकाळी होणार आहे. क्रिकेट फॅन्सना डिस्ने प्लस हॉटस्टारवर हा सामना पाहता येणार आहे. 

'येथे' मोफत पाहता येणार?

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात नागपुरात खेळला जाणारा पहिला कसोटी सामनाही तुम्ही मोफतही पाहू शकता. हा सामना Jio TV वर मोफत पाहता येणार आहे. तसेच जर तुम्ही टाटा स्काय वापरकर्ते असल्यास, तुम्ही टाटा प्ले अॅपला भेट देऊन कोणतेही पैसे न देता सामने मोफत पाहू शकता. 

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

9-13 फेब्रुवारी: पहिली कसोटी, नागपूर
17-21फेब्रुवारी: दुसरी कसोटी, दिल्ली
1-5 मार्च: तिसरी कसोटी, धर्मशाला
9-13 मार्च: चौथी कसोटी, अहमदाबाद

दोन्ही संघाची प्लेईंग इलेव्हन

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएल राहुल, केएस भरत (विकेटकिपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), अॅश्टन आगर, पॅट कमिन्स (कर्णधार), नॅथन लियॉन, स्कॉट बोलँड