IND VS AUS 1st Test : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 22 नोव्हेंबर पासून बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) टेस्ट सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली आहे. पर्थच्या स्टेडियमवर शुक्रवारी सामन्याचा पहिला दिवस पार पडला. यात दिवसाअंती टीम इंडिया 83 धावांनी आघाडीवर आहे. तर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी 27 ओव्हरमध्ये ऑस्ट्रेलियाच्या 67 धावा केल्या आहेत. पहिल्या दिवशी पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाच्या (Team India) फलंदाजांनी निराशा केली मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये गोलंदाजांनी मात्र घातक गोलंदाजी करून कहर केला.
पर्थ टेस्टच्या पहिल्या दिवशी टीम इंडियाचा कर्णधार जसप्रीत बुमराह याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी सामन्याच्या सुरुवातीलाच टीम इंडियाची टॉप ऑर्डर स्वस्तात माघारी परतली. यशस्वी जयस्वाल आणि देवदत्त पड्डीकल शून्यावर बाद झाले तर केवळ के एक राहुलने 26 धावा केल्या. टीम इंडियाकडून केएल राहुल (26), पंत (37), ध्रुव जुरेल (11), नितीश रेड्डी (41) वगळता इतर फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या सुद्धा करता आली नाही. विराट कोहली (Virat Kohli) तर अवघ्या 5 धावांवर ऑल आउट झाला. टीम इंडियाला 150 धावांवर ऑल आउट करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजापैकी हेजलहूडने सर्वाधिक ४ तर मिचेल स्टार्क, कमिन्स आणि मिचेल मार्शने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.
टीम इंडियाचे फलंदाज पर्थ टेस्टच्या पोहिल्या इनिंगमध्ये मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना स्वस्तात बाद करण्याचे आव्हान टीम इंडियाच्या गोलंदाजांवर होते. यावेळी कर्णधार बुमराहने नॅथन मॅकस्विनीच्या रूपाने ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट घेतली. त्यानंतर एकामोगोमाग एक विकेट्सची माळच लागली. यात बुमराहने सर्वाधिक 4, मोहम्मद सिराजने 2 तर हर्षित राणा याने 1 विकेट घेतली. गोलंदाज हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण केले. पदार्पणाच्या सामन्यातच त्याने विकेट मिळवली. दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचे गोलंदाज लवकरात लवकर उर्वरित 3 विकेट्स घेऊन ऑस्ट्रेलियाला ऑल आउट करण्याचा प्रयत्न करेल.
केएल राहुल, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकिपर) , ध्रुव जुरेल, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह (कर्णधार), मोहम्मद सिराज.
उस्मान ख्वाजा, नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकिपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवुड