इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर

IND vs ENG: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या टीम इंडियाचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून सामन्याआधी जोरदार सराव केला. यादरम्यानचे काही फोटो समोर आले आहेत. 

राजीव कासले | Updated: Oct 27, 2023, 03:11 PM IST
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियाचा अजब सराव, काय आहे 'उल्टा प्लान'... फोटो आले समोर title=

ICC Cricket World Cup 2023: आयसीसी विश्वचषकात रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियाने (Team India) सलग पाच सामने जिंकले आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया पॉईंटटेबलमध्येही (World Cup PointTable) अव्वल स्थानावर असून या विश्वचषकात आतापर्यंतच्या सामन्यात अपराजीत राहाणारी हा एकमेव संघ आहे. टीम इंडियाने पाचव्या सामन्यात न्यूझीलंडचा पराभव केला. आता टीम इंडियाचा सहावा सामना गतविजेत्या इंग्लंडविरुद्ध  (India vs England) खेळवला जाणार आहे. रविवारी म्हणजे 29 ऑक्टोबरला लखनऊच्या एकाना स्टेडिअममध्ये हा सामना रंगणार आहे. 

टीम इंडियाचा अजब सराव
इंग्लंडविरुद्धच्या सामन्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये दाखल झाली असून जोरदार सराव केला सुरु केलाय. सराव शिबिरात टीम इंडियाने अगदी वेगळ्या पद्धतीने सराव केला. या सरावातले फोटो समोर आले असून हा उल्टा प्लान नेमका आहे तरी काय याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींना लागलीय. 

व्हायरल होणाऱ्या फोटोत उजव्या हाताने गोलंदाजी करणारा जसप्रीत बुमराह डाव्या हाताने गोलंदाजी करताना दिसतोय. तर डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करणारा रवींद्र जडेजा चक्क उजव्या हाताने गोलंदाजी केली. इतकंच काय तर डाव्या हाताने गोलंदाजी करमारा कुलदीप यादवही उजव्या हाताने चेंडू फिरवताना दिसला. याशिवाय सराव शिबिरात विराट कोहली आणि रोहित शर्मानेही गोलंदाजीचा सराव केला. टीम इंडियाचा युवा सलामीवीर शुभमन गिलनंही चक्क फलंदाजीऐवजी नेटमध्ये गोलंदाजी केली. सरावाचा हा एक भाग असल्याचं टीम इंडियाकडून सांगण्यात आलंय. 

आता टीम इंडियाच हा उल्टा प्लान कोणत्या रणनितीचा भाग आहे की फक्त धमाल-मस्तीसाठी असे फोटो काढलेत हे अजून स्पष्ट झालेलं नाही. पण टीम इंडिया सध्या जबरदस्त फॉर्मात आहे हे नक्की

भारत-इंग्लंड आमनेसामने
भारत आणि इंग्लंडदरम्यानचा सामना लखनऊच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. या मैदानात विश्वचषकातील आतापर्यंतचे तीन सामने खेळवण्यात आलेत. यात पहिली फलंदाची करणारा संघ एकदा तर दुसरी फलंदाजी करणारा संघ दोनदा विजयी झालाय. विशेष म्हणजे तीनही सामन्यात खेळपट्टी गोलंदाजाला मदत करणारी ठरली आहे. या खेळपट्टीवर वेगवान आणि फिरकी गोलंदाजांना मदत मिळतेय. 

या स्पर्धेत गतविजेती इंग्लंडची कामगिरी सुमार झाली आहे. इंग्लंड संघ आतापर्यंत चार सामने खेळलाय आणि यातल्या केवळ एका सामन्यात विजय मिळवता आलाय. ज्या तीन सामन्यात इंग्लंडला पराभव स्विकारावा लागलाय ते सर्व सामने एकतर्फी झालेत. पॉईंटेटबलमध्ये  इंग्लंडचा संघ नवव्या स्थानावर आहे. 

भारत-इंग्लंड हेड टू हेड
भारत आणि इंग्लंडदरम्यान आतापर्यंत 106 सामने खेळवण्यात आलेत. यातल्या 57 सामन्यात टीम इंडियाने तर तर 44 सामन्यात इंग्लंडने विजय मिळवलाय. विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडचा रेकॉर्ड चांगला आहे. विश्वचषकात भारत आणि इंग्लंड आतापर्यंत 8 वेळा आमने सामने आलेतय, यातल्या चार सामन्यात इंग्लंड तर 3 सामन्यात भारत विजयी झालाय.