Rohit Sharma Statement IND vs IRE: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून आयरलँडविरूद्धचा पहिला सामना टीम इंडियाने जिंकला. न्यूयॉर्कच्या नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये हा सामना खेळला. अवघ्या 96 रन्सचं टारगेट असलेल्या या सामन्यात भारताने 8 विकेट्स राखून विजय मिळवला. सामन्यात फलंदाजी करताना दुखापत झाल्यानंतर रोहित शर्मा रिटायर्ड हर्ट झाला. दरम्यान हिटमॅनला दुखापत झाल्याने चाहते मात्र चिंतेत होते. टी-20 वर्ल्डकपमधील पहिल्या विजयानंतर रोहितने त्याला झालेल्या दुखापतीबाबत अपडेट्स दिले आहेत.
पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, हा फक्त हाताची हलकी दुखापत होती. थोडासा स्टीफनेस जाणवतोय.
हे सर्व सामने अमेरिकेत होत असून पीचबाबत बोलताना कर्णधाराने काय अपेक्षा करावी याबाबत अनिश्चितता व्यक्त केली. यावेळी अशा खेळपट्टीसाठी रणनीती बनवण्याच्या आव्हानावर रोहितने भर दिला. त्यावेळी 4 स्पिनर्स खेळवणं शक्य होणार नाही, असंही रोहितने सांगितलंय.
रोहित शर्माच्या सांगण्यानुसार, टॉसच्या वेळीही मी असंच म्हटलं होतं. या पीचकडून काय अपेक्षा ठेवायची हे मला माहीत नाही. पाच महिने जुनी असलेल्या खेळपट्टीवर कसं खेळलं पाहिजे याचा मला अंदाज मला नाहीये. दुसऱ्या डावात आम्ही फलंदाजी करत असतानाही विकेट सेट झाली होती, असं मला वाटत नाही.
न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने आयर्लंडचा 8 गडी राखून पराभव केला. आयरलँडने दिलेलं लक्ष्य टीम इंडियाने 12.2 ओव्हर्समध्ये गाठलं. भारताकडून कर्णधार रोहित शर्माने 52 धावा केल्या. पण टीम इंडियासाठी गड आला खरा पण सिंह मात्र जायबंदी झाल्याचं पहायला मिळालं. याचं कारण म्हणजे रोहित शर्मा पहिल्याच सामन्यात दुखापग्रस्त झाला.
रोहित शर्माने आयर्लंडविरुद्ध खेळताना 36 चेंडूत आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 30 वं अर्धशतक पूर्ण केलं. मात्र, ओव्हर संपताच तो फिजिओसोबत मैदानाबाहेर गेला. आधीच्या ओव्हरमध्ये एक बॉल रोहितच्या उजव्या हातावर बसला. त्यामुळे त्याला फिजिओची मदत घ्यावी लागली. मात्र, मैदानात उपचार केल्यानंतर देखील रोहित शर्माने मैदान सोडलं. रोहित शर्मा दुखापतग्रस्त होताच टीम इंडियाच्या चाहत्यांना मात्र चिंता लागून राहिली होती.