हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकचा हॉट अवतार, या व्हिडीओने इंटरनेटवर उडावली खळबळ

उद्यापासून हार्दिक त्याच्या खेळामुळे चर्चेत राहिलच, परंतु आज मात्र सोशल मीडियावर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकची  (Natasa Stankovic) चर्चा सुरु आहे.

Updated: Apr 8, 2021, 02:28 PM IST
हार्दिक पांड्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकचा हॉट अवतार, या व्हिडीओने इंटरनेटवर उडावली खळबळ title=

मुंबई : उद्यापासून IPLच्या 14 व्या सीझनची सुरवात होणार आहे. मुंबई इंडियन्स आणि रोयाल चॅलेन्ज बँगलोर या दोन टीम सीझनची दमदार सुरवात करणार आहेत. अशाच मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचाही खेळ आपल्याला पाहायला मिळणार आहे. उद्यापासून हार्दिक त्याच्या खेळामुळे चर्चेत राहिलच, परंतु आज मात्र सोशल मीडियावर त्याची पत्नी नताशा स्टॅनकोव्हिकची  (Natasa Stankovic) चर्चा सुरु आहे.

हार्दिक पांड्याची पत्नी सर्बियन मॉडेल नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic) स्विमिंग पुलमध्ये हॅाट अंदाजात दिसली. नताशा स्टॅनकोव्हिकने या फोटोंमुळे इंटरनेटवर खळबळ उडविली आहे. नताशा स्टॅनकोव्हिक सध्या आपला पती हार्दिक पांड्यासह चेन्नईत आहेत.

नताशाचा हॉट अवतार

नताशा स्टॅनकोव्हिक तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती एका स्विमिंग सूट घालून स्विमिंग पुलमध्ये जात असल्याचे दिसते. नताशा स्टॅनकोव्हिकच्या या हॉट अवतारमुळे इंटरनेटवर लोक खूप लाईक्स आणि शेअर करत आहेत.

नताशाचा हा व्हिडीओ कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्माने शूट केला आहे. नताशा प्रथम ऑरेंज कलरच्या मीडी ड्रेसमध्ये दिसली. यानंतर लगेचच ती ड्रेस चेन्ज करुन स्विमिंग शूट घालून स्विमिंग पुलमध्ये जात असल्याचे दिसते. नताशाच्या या व्हिडीओला हार्दिक पंड्याने ही लाईक केला आहे. नताशाच्या या व्हिडीओला 5 लाखाहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. यापूर्वी नताशा अनेक वेळा पती हार्दिक पांड्यासोबत स्विमिंग पुलमध्ये मजा करताना दिसली आहे.

नताशा स्टॅनकोव्हिक (Natasa Stankovic)  एक सर्बियन अभिनेत्री, मॉडेल आणि डांसर आहे. नताशाने प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या 'सत्याग्रह' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तसेच तिला बिग बॉसच्या 8 व्या सीझन आणि बादशाहाच्या 'डीजे वाले बाबू' या गाण्यापासून पॉपुलर झाली आहे. नताशा 2012 साली अभिनयक्षेत्रात करिअर करण्यासाठी भारतात आली होती. फिलिप्स, कॅडबरी आणि जॉन्सन ऍन्ड जॉन्सन सारख्या ब्रँडसोबत तिने मॉडेल म्हणून सुरुवात केली आहे.

2013 मध्ये, प्रथमच या सर्बियन मॉडेलला 'सत्याग्रह' चित्रपटातून बॉलवुडला ब्रेक मिळाला. अमिताभ बच्चन, अजय देवगण आणि करीना कपूर यांनी अभिनय केलेल्या या चित्रपटात नताशाने 'आययो जी' या गाण्यावर आयटम नंबर केला होता. तिने 'फुकरे रिटर्न्स' मध्ये 'मेहबूबा' या गाण्यावर डान्स नंबर केला. तसंच शाहरुखच्या 'झिरो' सिनेमातही त्याने कॅमिओहा रोल केला होता.