अबुधाबी : इंडियन प्रीमियर लीग 2020 चे सामने आतापर्यंत रोमांचक ठरले आहे. जगातील सर्वात मोठ्या टी-20 लीगमधील पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स (MIvsKKR)भिडणार आहे. या सामन्यात दोन्ही संघात असलेल्या धडाकेबाज खेळाडूंचा सामना होणार आहे. एमआय आणि केकेआरच्या या सामन्यात अनेक खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वाचं लक्ष असणार आहे. पण हार्दिक आणि रसेल यांची कामगिरी निर्णायक ठरणार आहे.
मुंबई इंडियन्सचा हार्दिक पांड्या आणि कोलकाता नाईट रायडर्सचा आंद्रे रसेल या ऑलराऊंडर खेळाडूंच्या कामगिरीवर सामन्याचा कौल ठरणार आहे. आयपीएलमधील हे सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहेत. या दोन्ही खेळाडूंमध्ये बॉलने विकेट घेण्याची आणि फलंदाजीने मोठे शॉट मारण्याची क्षमता आहे. एकीकडे, रसेल आयपीएलमध्ये सर्वाधिक स्ट्राईक रेट असणारा फलंदाज आहे. दुसरीकडे, हार्दिक पांड्या आपल्या तुफानी फलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीसाठी प्रसिध्द आहे. अशा परिस्थितीत, आयपीएल 13 दरम्यान होणारा केकेआर विरुद्ध एमआय सामना दरम्यान या दोन्ही खेळाडूंवर सर्वांचं लक्ष असेल.
आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या आयपीएल रेकॉर्ड्सकडे नजर टाकल्यास, रसेलने 64 आयपीएल सामन्यांमध्ये 186.41 च्या स्ट्राँग रेटने 1400 धावा केल्या आहेत आणि 55 विकेट घेतले आहेत. दुसरीकडे मुंबई इंडियन्सच्या (एमआय) हार्दिक पांड्याने 67 आयपीएल सामन्यांमध्ये 154.57 च्या शानदार स्ट्राइक रेटने 1082 धावा केल्या आहेत. तर पांड्यानेही 42 विकेट्स घेतल्या आहेत.
गेल्या वर्षी आयपीएल 12 सीजनमध्ये मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यात रसेलने 40 बॉलमध्ये नाबाद 80 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये 6 फोर आणि 8 सिक्सचा समावेश आहे. हार्दिक पांड्याने 34 बॉलमध्ये 91 रनची शानदार खेळी केली होती. ज्यामध्ये 6 फोर आणि 9 सिक्सचा समावेश होता.