माजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळला

BCCI: भारतीय क्रिकेटमध्ये प्रतिभावान खेळाडूंची कमतरता नाही. दरवर्षी अनेक नवे चेहरे भारतीय संघात सामील होत असतात. पण यामधील काहींनाच यशाची चव चाखायला मिळते आणि त्यांचा प्रवास शेवटपर्यंत जातो. दरम्यान 24 वर्षांनी एका खेळाडूने बीसीसीआय सचिवांच्या एका निर्णयामुळे आपलं करिअर संपलं असा आरोप केला आहे.   

शिवराज यादव | Updated: Aug 28, 2024, 03:05 PM IST
माजी BCCI सचिवांनी आठवड्याभरात संपवलं अष्टपैलू खेळाडूचं करिअर, आता SBI मध्ये करतोय काम; गांगुली-द्रविडसोबतही खेळला title=

Gyanendra Pande: भारतामध्ये क्रिकेटवं वेड इतकं आहे की, जवळपास प्रत्येकाची आपण भारतीय संघातून खेळावं अशी इच्छा असते. यामधील काहीजण क्रिकेट करिअर निवडत भारतीय संघापर्यंत मजलही मारतात. पण यातील काहींचंच नशीब चमकतं आणि त्यांना यशाची चव चाखण्याची संधी मिळते. तर काहीजण फक्त आपल्या कौशल्याच्या आधारे हे यश खेचून आणतात आणि ते शेवटपर्यंत टिकवतात. दरम्यान एका 24 वर्षीय खेळाडून आपलं करिअर कसं संपलं याबद्दल सांगितलं आहे. 

पाकिस्तानविरोधात केलं होतं पदार्पण

ज्ञानेश पांडे याच्याबद्दल आपण बोलत आहोत, ज्याने स्थानिक क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. त्याने सौरभ गांगुली आणि राहुल द्रविड यासारख्या दिग्गज क्रिकेटपटूंसह क्रिकेट खेळलं आहे. 1999 मध्ये त्याने पाकिस्तानविरोधातील सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. 

त्याने दलीप ट्रॉफी, देवधर ट्रॉफी आणि चॅलेंजर ट्रॉफीत जबरदस्त कामगिरी केली होती. यानंतर भारतीय संघात त्याची निवड झाली होती. पण दुर्दैवाने फक्त आठवड्याभरात त्याचं करिअर संपलं. पाकिस्तानविरोधातील सामन्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. अखेर या खेळाडूने यावर 24 तासांनी मौन सोडलं असून बीसीसीआयचे माजी सचिव जयवंत लेले यांच्याबाबत मोठं विधान केलं आहे. 

ज्ञानेश पांडेने काय सांगितलं?

ज्ञानेश पांडेनुसार त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. न्यूझीलंडविरोधातील पुढील मालिकेत आपल्याला जागा मिळायला हरकत नव्हती. लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत ज्ञानेश पांडेने सांगितलं की, "1997 मध्ये मी चांगली कामगिरी केली होती. दलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये मी 44 धावा केल्या होत्या आणि 3 विकेट्स घेतले होते. देवधऱ ट्रॉफीत माझी कामगिरी लक्षणीय होती. नॉर्थ झोनमध्ये विक्रम राठोड, विरेंद्रे सेहवाग आणि नवज्योत सिंग सिद्धू होते. मी पाच विकेट घेतले आणि नाबाद 23 धावा केल्या. वेस्ट झोनविरोधात मी नाबाद 89 धावा केल्या आणि ईस्ट झोनविरोधात 2-3 विकेट घेतल्या. साऊथ झोनविरोधात मी नाबाद 28 किंवा 30 धावा करत 2-3 विकेट्स घेतल्या होत्या. चॅलेंजर ट्रॉफीत मी रॉबिन सिंह आणि अमय खुरसिया यांची विकेट घेतली होती. इंडिया ए साठी मी 26 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यानंतर मला भारतीय संघासाठी बोलावणं आलं होतं. ही 1999 ची गोष्ट आहे".

'आम्ही हाताळू शकलो नाही'

न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत तुमची निवड झाली, पण त्यावेळी अचानक बीसीसीआयच्या सचिवांचे वक्तव्य आलं, 'कुंबळेने ब्रेक मागितला असेल आणि डाव्या हाताच्या गोलंदालाच खेळवायं होतं तर मग सुनील जोशीची निवड का केली नाही?' यावर पांडे यांनी उत्तर देत सांगितलं की, "लेले यांना जे काही बोलायचं होतं, त्याबद्दल त्यांनी विचार करायला हवा होता. त्यांनी माझा कामगिरी पाहायला हवी होती. ते एक अंपायरदेखील होते. मला वाटतं ही माझी चूक होती. मला युक्त्या माहिती नव्हत्या. गोष्टी कशाप्रकारे चालतात याची मला कल्पना नव्हती. मी हे सांभाळू शकलो नाही आणि बदनाम झालो. मीडियानेही माझी गोष्ट छापली नाही. कोणीही मला काहीही विचारण्यासाठी आलं नाही. त्यांनी फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला". ज्ञानेश पांडे सध्या एसबीआयमध्ये पीआर एजंट म्हणून काम करत आहे.