Jay Shah become ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदचे (ICC) पुढील अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. जय शहा 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. जय शहा 1 डिसेंबर 2024 पासून आयसीसी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारतील. सध्याचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने आता नव्या अध्यक्षांची निवड झाली आहे. आयसीसीच्या अध्यक्षांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो.
Jay Shah has been elected unopposed as the next Independent Chair of the ICC.https://t.co/Len6DO9xlE
— ICC (@ICC) August 27, 2024
आयसीसीच्या इतिहासातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांच्या नावाची नोंद झाली आहे. जय शहा आयसीसीचे अध्यक्ष होणार हे निश्चित मानले जात होते. आयसीसी अध्यक्षपदासाठी एकूण 16 सदस्य मतदान करतात. शहा यांना निवडणूक जिंकण्यासाठी 9 मतांची गरज होती. जय शहा यांच्या बाजूने बहुमतापैक्षा जास्त मतं होती, त्यामुळे त्यांच्याविरोधात कोणीही उभं राहण्याची हिंमत दाखवली नाही. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डांनी त्याला आधीच उघड पाठिंबा दिला होता. अशातच आता आरसीसीकडून अधिकृत घोषणा केली गेली आहे.
जय शाह यांनी 2009 मध्ये क्रिकेट प्रशासनात एन्ट्री घेतल्यानंतर गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव पद भूषवलं. त्यानंतर 2015 साली जय शाह बीसीसीआयमध्ये सहभागी घेतला. नंतर सप्टेंबर 2019 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव झाले आणि आता आयसीसीचे अध्यक्ष झाले आहेत. जय शाहच वय 35 वर्ष आहे. जय शाह यांच्याआधी जगमोहन दालमिया, शरद पवार, एन श्रीनिवासन आणि शशांक मनोहर हे भारतीय आहेत, ज्यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवलंय.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी नामांकन मिळाल्याने मी नम्र झालो आहे, असं जय शहा म्हणाले. क्रिकेटचे जागतिकीकरण करण्यासाठी मी आयसीसी संघ आणि आमच्या सदस्य राष्ट्रांसोबत जवळून काम करण्यास वचनबद्ध आहे. संतुलन राखणे, प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रोत्साहन देणे आणि नवीन जागतिक बाजारपेठांमध्ये आमच्या मार्की इव्हेंट्सची ओळख करून देणे अधिक महत्त्वाचे आहे. क्रिकेटला पूर्वीपेक्षा अधिक सर्वसमावेशक आणि लोकप्रिय बनवणे हे आमचे ध्येय आहे, असं जय शहा यांनी म्हटलं आहे.