आजोबांनी भेट दिलेल्या बॅटने 'या' भारतीय क्रिकेटपटूने वर्ल्ड रेकॉर्ड रचला

या भारतीय फलंदाजाने कारकिर्दीतील पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये सलग 3 शतकं झळकावली होती.

Updated: May 22, 2021, 09:29 PM IST
आजोबांनी भेट दिलेल्या बॅटने 'या' भारतीय क्रिकेटपटूने वर्ल्ड रेकॉर्ड रचला   title=

मुंबई : टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणजे  (Mohammed Azharuddin) मोहम्मद अझहरुद्दीन. अझहरुद्दीन त्याच्या चलाखीमुळे ओळखला जायचा. तो जितका चांगला फलंदाज होता, त्यापेक्षा अधिक पटीने उत्तम बॅट्समन होता. याची झलक त्याने कारकरिर्दीतील पहिल्या 3 सामन्यांमध्येच दाखवून दिली. अझहरुद्दीने पदार्पणातील सामन्यात विक्रमी कामगिरी केली होती. अझहरुद्दीने त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या 3 टेस्ट मॅचमध्ये सलग 3 शतकं झळकावली होती. तेव्हापासून अझरुद्दीनची गणती ही सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. (Former India captain Mohammad Azharuddin tweeted of bat with which he makes world record)

विशेष म्हणजे अझहरुद्दीनच्या क्रिकेट कारकिर्दीवर सिनेमाही करण्यात आला. यावरुन अझहरुद्दीन किती भारी फलंदाज होता, याचा अंदाज बांधता येऊ शकतो. अझहरुद्दीनच्या जडणघडणीत त्याच्या आजोबांचं महत्वपूर्ण योगदान राहिलं आहे. या सिनेमात अझहरुद्दीनच्या आजोबांची भूमिका महत्वपूर्ण राहिली आहे. अझहरुद्दीनला त्याचे आजोबा गिफ्ट म्हणून बॅट देतात. या बॅटनेच अझहरुद्दीन पदार्पणातील सामन्यात सेंच्युरी ठोकतो, असा सिन या सिनेमात दाखवला आहे. अझहरुद्दीन त्या बॅटचा फोटो ट्विट केला आहे. तसेच या ट्विटमध्ये रेट्रो जर्सीतला फोटोही शेअर केला आहे.  

ट्विटमध्ये काय म्हटलंय?

" या बॅटने कारकिर्दीतील पहिले 3 कसोटी सामन्यात 1984-85 मध्ये इंग्लंड विरुद्ध 3 शतकं लगावण्याचा विश्व विक्रम केला होता. त्या एका मोसमात या बॅटने 800 पेक्षा अधिक धावा केल्या होत्या. या बॅटची निवड माझ्या आजोबांनी केली होती", असं अझहरुद्दीनने या ट्विटमध्ये म्हटलंय.  

अझहरुद्दीनची क्रिकेट कारकिर्द

अझहरुद्दीनने 99 कसोटी सामन्यांमध्ये 6 हजार 215 धावा केल्या आहेत. यात त्याने 22 शतक आणि 21 अर्धशतक लगावली आहेत. तर 334 वनडे मॅचमध्ये 7 सेंच्युरी आणि 58 हाफ सेंच्युरीसह 9 हजार 378 धावा केल्या.