Rinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान

Shah Rukh Khan On Rinku Singh : बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो. यादरम्यान शाहरुख खानला एाक चाहत्याने रिंकू सिंहबाबत प्रश्न विचारल, ज्यावर शाहरुख चांगलाच भडकला.

राजीव कासले | Updated: Jun 26, 2023, 02:14 PM IST
Rinku Singh बच्चा नाही, बाप आहे! आपल्याच खेळाडूवरच्या प्रश्नावर भडकला शाहरुख खान title=

Shah Rukh Khan On Rinku Singh: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख (Shah Rukh Khan) आपल्या आगामी चित्रपटांचं सध्या सोशल मीडियावर (Social Media) प्रमोशन करण्यात व्यस्त आहे. पठाण (Paathan) चित्रपटावेळीही शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधत चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. आता आगामी चित्रपटासंदर्भातही ट्विटरवर 'आस्क एसआरके' (AskSRK) हा कार्यक्रम चालवला जातोय. यादरम्यान एक शाहरुख खानने कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) खेळाडू रिंकू सिंह (Rinku Singh) याबाबत एक ट्विट केलं असून सध्या सोशल मीडियावर या ट्विटरची जोरदार चर्चा आहे. 

'AskSRK' सेशनमध्ये एका युजरने रिंकू सिंह संदर्भात एक प्रश्न विचारला. पण प्रश्न विचारताना या युजरसने रिंक सिंहचा उल्लेख बच्चा असा केला. 'केकेआरचा बच्चा रिंकू सिंहबाबत एक शब्द बोला' अशी विनंती या युजरने शाहरुख खानला केली. पण या प्रश्नावर शाहरुख खान वैतागला आणि त्याने प्रश्न विचारणाऱ्या युजरला सुनावलं. किंग खानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं 'रिंकू बाप आहे, बच्चा नाही'. रिंकू सिंह क्रिकेटमध्ये सर्वांच बाप आहे असं शाहरुख खाननला म्हणायचं होतं. 

ट्विट सोशल मीडियावर व्हायरल
शाहरुख खानचं हे ट्विट सोशल मीडियावर (Social Media) चांगलंच व्हायरल झालं आहे. या ट्विटला आतापर्यंत दोन हजाराहून अधिक रिट्विट करण्यात आलं आहे. तर 600 हून अधिक लोकांनी यावर कमेंट केलं आहे. 17 हजाराहून जास्त लाईक्स आले आहेत. रिंकू सिंह हा शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्सचा सदस्य आहे. गेल्या काही हंगामापासून रिंकू शाहरुखच्या संघातून खेळतोय. गेल्या हंगामात रिंकूने जबरदस्त फलंदाजी करत संपूर्ण क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं होतं. 

टी20 संघात समावेश?
पुढच्या म्हणजे जुलै महिन्यात टीम इंडियाचा वेस्ट इंडिज दौरा आहे (Team India Tour of West Indies). या दौऱ्यात भारतीय संघ दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा बीसीसीआयने केली आहे. अद्याप टी20 संघाची निवड बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार टी20 मालिकेत धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंहला संधी मिळण्याची शक्यता आहे. 

टी20 भारतीय संघाचं नेतृत्व हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) असेल तर अनेक युवा खेळाडूंना या मालिकेत संधी मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलमध्ये रिंकू सिंग बेस्ट फिनिशर म्हणून समोर आला होता. रिंकू सिंहच्या रुपाने टीम इंडियाला चांगला पर्याय उपलब्ध होऊ शकतो. आयपीएल 2023 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना रिंकू सिंहने अनेक आक्रमक इनिंग खेळल्या आहेत. यात एक ओव्हरमधअये पाच सिक्स लगावत केकेआरला त्याने जिंकून दिलं होतं.