पुढच्या हंगामात धोनी नाही तर CSK चा कर्णधार कोण?

जडेजा-धोनी नाही, तर हा खेळाडू पुढच्या हंगामात CSK चा कर्णधार? तुम्हाला काय वाटतं कोणाला द्यावी कमान

Updated: May 5, 2022, 02:17 PM IST
पुढच्या हंगामात धोनी नाही तर CSK चा कर्णधार कोण?  title=

मुंबई : आपीएलमध्ये 4 ट्रॉफी मिळवलेली चेन्नई टीम यंदा मात्र प्लेऑफमधून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. चेन्नईचं कर्णधारपद रविंद्र जडेजाकडे देण्यात आलं होतं. मात्र त्याने कर्णधारपदावरून पायउतार करण्याचा निर्णय घेतला. रविंद्र जडेजानं कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवलं. 

यंदा धोनी शेवटचं आयपीएल खेळणार अशी चर्चा आहे. रविंद्र जडेजा आणि महेंद्रसिंह धोनी दोघंही पुढच्यावर्षी कर्णधारपदी असणार नाहीत अशीही चर्चा आहे. त्यामुळे चेन्नईच्या कर्णधारपदाचा पुढचा दावेदार कोण असा प्रश्न आहे. 

रविंद्र जडेजाकडे कर्णधारपद येणार हे त्याला गेल्या हंगामात माहिती होतं. यंदाच्या हंगामात त्याच्याकडे कर्णधारपद आल्यानंतर चेन्नईचे ग्रह फिरले. चेन्नईला केवळ 10 पैकी 3 सामने जिंकले आहेत. जडेजानं कर्णधारपद पुन्हा धोनीकडे सोपवलं. यंदाच्या हंगामापुरतं धोनीच कर्णधार असणार आहे. पुढच्या हंगामाबाबत त्याने कोणतंही विधान केलं नाही. 

धोनी दोन वर्षांपासून खूप चांगल्या फॉर्ममध्ये खेळताना फार कमीच वेळा दिसला. तो कदाचित पुढच्यावर्षी आयपीएलमधून निवृत्ती घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्णधारपदाची कमान युवा खेळाडूवर सोपवली जाऊ शकते. 

चेन्नईचं कर्णधारपद ओपनिंग फलंदाज ऋतुराज गायकवाडकडे दिलं जाऊ शकतं. गेल्यावर्षी त्याने उत्तम कामगिरी केली होती. यंदा मात्र ऋतुराज गायकवाडचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. 

गायकवाड खूपच तरुण असून त्यांची या संघाची कारकीर्द मोठी आहे. सीएसकेच्या व्यवस्थापनाचाही या खेळाडूवर विश्वास असून त्यांनी लिलावापूर्वी मोठी रक्कम देऊन त्याला रिटेन करण्यात आलं. पुढच्या वर्षी कर्णधारपद त्याच्याकडे जाण्याची शक्यता आहे.