शिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा

Shikhar Dhawan Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय. 

राजीव कासले | Updated: Aug 24, 2024, 02:49 PM IST
शिखर धवन असा बनला टीम इंडियाचा 'गब्बर', म्हणून देतो मिशिला पीळ...पहिल्यांदाच झाला उलगडा  title=

Shikhar Dhawan get the name Gabbar : टीम इंडियाचा गब्बर अर्थात शिखर धवनने (Shikhar Dhawan) आंतरराष्ट्रीय क्रिकेटाल अलविदा केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटबरोबरच स्थानिक क्रिकेटमधूनही निवृत्ती घेत असल्याचं शिखर धवनने सांगितलंय. सोशल मीडिया एक्सवर त्याने एक भावूक पोस्ट करत आपली निवृत्ती (Retirement) जाहीर केली. गेल्या अनेक काळापासून शिखर धवन टीम इंडियाच्या बाहेर आहे. क्रिकेटच्या कोणत्याच फॉर्मेटमध्ये टीम इंडियात (Team India) पुनरागमनाची शक्यता नसल्याने अखेर शिखर धवनने निवृत्तीचा निर्णय घेतला. शिखर टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना 2018 मध्ये खेळला होता. तर शेवटचा टी20 सामना 2021 मध्ये तर शेवटचा एकदिवसीय सामना 2022 मध्ये खेळला होता. म्हणजे जवळपास दोन ते तीन वर्षांपासून शिखर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.

गब्बर नाव कसं पडलं?
टीम इंडियात शिखर धवन हा गब्बर नावाने ओळखला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का? शिखर धवनला गब्बर (Gabbar) हे नाव कंस पडलं आणि कोणी दिलं. याची कहाणी खूपच मनोरंजक आहे. मिशिवर पीळ आणि मांडीवर थाप ही त्याची स्टाईल चांगलीच गाजली.

शिखर धवनची पोस्ट
शिखर धवनने भावनिक पोस्ट करत निवृत्तीची घोषणा केली. या पोस्टमध्ये त्याने लिहिलंय 'माझ्या आयुष्यात एकच ध्येय होतं, भारतीय क्रिकेट संघासाठी खेळयाचं. हे ध्ये गाठण्यात मी यशस्वी ठरलो. यासाठी मी अनेक लोकांचा आभारी आहे. आयुष्यात पुढे जाण्यासाठी काही पानं पलटावी लागतात. मी आता त्याच वळणावर उभा आहे. मी आंतरराष्ट्रीय आणि स्थानिकक्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. देशासाठी खूप सामने खेळण्याचं भाग्य मला लाभलं. यासाठी मी बीसीसीआय आणि चाहत्यांना धन्यवाद देतो'

कोणी दिलं गब्बर नाव?
गब्बर नाव कसं पडलं याचा उलगडा शिखर धवनने एका मुलाखतीत केला होता.  रणजी ट्रॉफी खेळत असताना एका सामन्यात सिली पॉईंटला उभा राहून फिल्डिंग करत होतो. फलंदाजी करत असलेल्या संघातील दोन फलंदाजांनी मोठी भागिदारी केली होती. त्यामुळे आमच्या संघाताली खेळाडू निराश झाले होते. यावेळी खेळाडूंचा तणाव घालवण्यासाठी मी जोरात ओरडलो 'बहुत याराना है सुअर के बच्चों' . यावर सर्व खेळाडू जोरजोरात हसायला लागले. आमचे प्रशिक्षक विजय यांनीही हे ऐकलं आणि त्यावेळी त्यांनी माझं नाव गब्बर असं ठेवलं. 

त्यादिवसापासून क्रिकेट जगतात आपण गब्बर नावाने ओळखले जाऊ लागले, असं शिखरने सांगितलं. स्थानिक क्रिकेट असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो टीम इंडियातील आणि इतर संघातील खेळाडूही शिखरला गब्बर नावानेच हाक मारतात. 

शिखरची क्रिकेट कारकिर्द
शिखर धवन टीम इंडियासाठी 34 कसोटी सामने खेळला असून त्यात त्याने 2315 धावा केल्या आहेत. यात 7 शतकं आणि 5 अर्धशतकं ठोकली असून 190 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तर 167 एकदिवसीय सामन्यात शिखरच्या नावावर 6793  जमा आहेत. यात तब्बल 17 शतकं आणि 39 अर्धशतकांचा समावेश आहे. धवनने 11 शतकांसह 68 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात  1759 धावा केल्या आहेत. भारताचा हुकमी सलामीवीर अशी शिखर धवनची ओळख होती.