'हा सगळा दिखावा... ' पूर्व पत्नी हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर पुन्हा गंभीर आरोप, केला धक्कादायक खुलासा

Mohammad Shami Wife : मुलीला भेटताच शमीने तिला कडकडून मिठी मारली आणि मॉलमध्ये जाऊन अनेक गोष्टी विकत घेतल्या. मात्र आता यावरून पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमीवर अनेक आरोप लावले असून हा सर्व दिखावा असल्याचं म्हंटलं आहे. 

पुजा पवार | Updated: Oct 4, 2024, 01:28 PM IST
'हा सगळा दिखावा... ' पूर्व पत्नी हसीन जहाँचे मोहम्मद शमीवर पुन्हा गंभीर आरोप, केला धक्कादायक खुलासा  title=
(Photo Credit : Social Media)

Hasin Jahan About Mohammad Shami : टीम इंडियाचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी मागील अनेक दिवसांपासून दुखापतीच्या कारणामुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. शमी त्याच्या प्रोफ्रेशनल लाईफ सह वैयक्तिक आयुष्याबाबत सुद्धा फार चर्चेत असतो. शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ हे दोघे वेगळे झाले असून दोन दिवसांपूर्वीच त्यांची मुलगी शमीला भेटण्यासाठी आली होती. यावेळी मुलीला भेटताच शमीने तिला कडकडून मिठी मारली आणि मॉलमध्ये जाऊन अनेक गोष्टी विकत घेतल्या. मात्र आता यावरून पूर्व पत्नी हसीन जहाँ हिने मोहम्मद शमीवर अनेक आरोप लावले असून हा सर्व दिखावा असल्याचं म्हंटलं आहे. 

शमीने शेअर केला होता व्हिडीओ : 

मोहम्मद शमीने काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ शेअर केला होता. यात तो आपल्या मुलीला भेटताना पाहायला मिळाला. तो मुलीला शॉपिंगला घेऊन गेला आणि तिच्या सोबत खूप छान वेळ घालवला. त्याने व्हिडीओ शेअर करून लिहिले की, 'खूप दिवसांनी तिला पुन्हा पाहिल्यावर वेळ थांबला. तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करतो बेबो'. शमी आणि त्याच्या मुलीचा हा व्हिडीओ पाहून शमीचे फॅन्स सुद्धा गहिवरले. अनेकांनी व्हिडीओ खाली कमेंट्स करून प्रतिक्रिया व्यक्त केल्या. 

हेही वाचा : एकाच मंडपात एकाच वेळी 4 भावांचं लग्न... T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला

पूर्व पत्नी हसीन जहाँने केले आरोप : 

हसीन जहाँने आनंदबाजार डॉट कॉमशी बोलताना म्हंटले की, 'हा फक्त दिखावा आहे. माझ्या मुलीचा पासपोर्ट एक्सपायर  झालाय आणि नवीन पासपोर्टसाठी तिला शमीची स्वाक्षरी हवी होती. म्हणून ती आपल्या वडिलांना भेटण्यासाठी गेली, परंतु त्यांनी स्वाक्षरी दिली नाही. ते आपल्या मुलीला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये गेले आणि ज्या कंपनीसाठी ते जाहिराती करतात अशा कंपनीच्या दुकानातून त्याने मुलीसाठी कपडे खरेदी केले. इथे काहीही खरेदी केल्यावर शमीला पैसे द्यावे लागत नाहीत. म्हणून ते मुलीला तिथे घेऊन गेले. माझ्या मुलीला गिटार आणि कॅमेरा हवा होता पण तिच्या आवडीच्या वस्तू शमीने तिला घेऊन दिल्या नाहीत'. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by (@mdshami.11)

तो माझ्या मुलीला विचारातही नाही : 

रिपोर्ट्सनुसार हसीन जहाँने पुढे म्हंटले की, 'शमी माझ्या मुलीला अजिबात विचारात सुद्धा नाहीत. ते केवळ स्वतःच बिझी असतात. शमी आणि मुलीची भेट ही एक महिन्यापूर्वीच झाली होती. पण त्यांनी तेव्हा हा व्हिडीओ शेअर केला नाही. मला वाटत त्याच्याकडे तेव्हा काही नव्हतं  म्हणून त्यांनी आता व्हिडीओ अपलोड केला आहे'.