एकाच मंडपात एकाच वेळी 4 भावांचं लग्न... T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला; नेत्रदीप सोहळ्याची क्षणचित्रे

राशिद खान सह त्याच्या तीन भावांनी देखील एकाच दिवशी लग्न केले. एकाच वेळी एकाच मंडपात पार पडलेल्या 4 लग्नांची चर्चा आता क्रिकेट विश्वात होऊ लागली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानची टीम राशिद आणि त्याच्या 3 भावांच्या लग्नात उपस्थित होती. 

पुजा पवार | Updated: Oct 4, 2024, 12:30 PM IST
एकाच मंडपात एकाच वेळी 4 भावांचं लग्न... T-20 मधील जगातील अव्वल गोलंदाज लग्नबंधनात अडकला; नेत्रदीप सोहळ्याची क्षणचित्रे title=
(Photo Credit : Social Media)

Rashid Khan Marriage: अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खान (Rashid Khan)  हा लग्न बंधनात अडकला असून 3 ऑक्टोबर रोजी अफगाणिस्तानात त्याचा शाही विवाह सोहळा पार पडला.  विशेष गोष्ट ही की राशिद खान सह त्याच्या तीन भावांनी देखील एकाच दिवशी लग्न केले. एकाच वेळी एकाच मंडपात पार पडलेल्या 4 लग्नांची चर्चा आता क्रिकेट विश्वात होऊ लागली आहे. संपूर्ण अफगाणिस्तानची टीम राशिद आणि त्याच्या 3 भावांच्या लग्नात उपस्थित होती. 

राशिद खानच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पख्तून प्रथा आणि परंपरांनुसार राशिद खानचं लग्न पार पडलं. अफगानिस्तानची राजधानी काबूलमध्ये राशिदचं शाही लग्न झालं. रिपोर्ट्सनुसार राशिदची पत्नी ही त्याच्या नात्यातलीच आहे. राशिद खान सह त्याचे तीन भाऊ कीउल्लाह, नुमान आणि नसीम खान यांनी सुद्धा लग्नासाठी 3 ऑक्टोबर हीच तारीख निवडली. ज्यामुळे त्याच्या कुटुंबात मोठा उत्सव साजरा झाला. 

पाहा व्हिडीओ : 

लग्नात सामील झाली अफगाणिस्तानची टीम : 

राशिद खानच्या लग्नाला अफगाणिस्तानची संपूर्ण टीम हजर होती. तसेच अनेक दिग्गज खेळाडूंनी देखील या शाही लग्नाला हजेरी लावली. काबुलच्या इंपीरियल कॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये हे लग्न झालं असून समोर आलेल्या फोटोंमधून अफगानिस्तानचा स्टार स्पिनर मोहम्मद नबी, ऑलराउंडर उमरजई,  नजीबुल्लाह जादरान, रहमत शाह आणि मुजीब उर रहमान इत्यादी खेळाडू राशिदच्या लग्नात एन्जॉय करताना दिसले. 

हेही वाचा : अपघातातून मिळाला नवीन जन्म, 6 कोटींचं कार कलेक्शन, ऋषभ पंतची संपत्ती पाहून डोळे फिरतील

 

राशिद खानची कारकीर्द : 

अफगाणिस्तानचा ऑल राउंडर क्रिकेटर 26 वर्षीय राशिद खान याने कमी वेळात आपल्या परफॉर्मन्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठं नाव कमावलं आहे. राशिद खान हा टी 20 फॉरमॅटमध्ये अफगाणिस्तान क्रिकेट टीमचा कॅप्टन असून त्यानं आतापर्यंत देशाकडून 105 वनडे, 93 टी 20, 5 टेस्ट सामने खेळले आहेत. यात वनडेत त्याने 1322 धावा आणि 190 विकेट्स घेतल्या असून टी 20 मध्ये 460 धावा 152 विकेट्स तर टेस्टमध्ये 106 धावा आणि 34 विकेट्स घेतल्या आहेत.