लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला

Mumbai Local News Today: मुंबई लोकलचा वेग वाढणार आहे. लवकरच पश्चिम रेल्वेवर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 22, 2024, 07:58 AM IST
लोकल वेग पकडणार, नागरिकांना वेळेत गाठता येणार ऑफिस; पश्चिम रेल्वेने तोडगा शोधला title=
mumbai local train update western railway planning to switch web on track to avoid delay

Mumbai Local News Today: लोकल ही मुंबईकरांची जीवनवाहिनी आहे. मात्र लोकलची गर्दी हा विषय चिंतेचा आहे. लोकलच्या गर्दीमुळं अनेकदा अपघात होण्याचीदेखील शक्यता असते. तर, अनेकदा लोकलमुळं ऑफिसात पोहोचण्यासाठीदेखील उशिर होतो. मात्र आता लोकलचा वेग वाढणार आहे. त्यामुळं पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. 

क्रॉसओव्हर पॉइंट म्हणजेच रेल्वे ट्रॅक बदलण्याच्या ठिकाणी लोकलचा वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळं वेळ जातो आणि परिणामी लोकल स्थानकात पोहोचण्यास उशीर होतो. हाच वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आता पश्चिम रेल्वेने क्रॉस ओव्हर पॉइंट्सवर थिक वेब स्विच बसवण्यास सुरुवात केली आहे. सध्या 54 टक्के काम पूर्ण झाले आहे. तर नव्या वर्षात उर्वरित काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या नव्या प्रकल्पामुळं लोकलचा वेग ताशी 50 किमीपर्यंत वाढणार आहे. त्यामुळं प्रवाशांना थोडा दिलासा मिळणार आहे. 

क्रॉस ओव्हर पॉइंटवर ट्रेन एका रुळावरुन दुसऱ्या रुळावर जाताना सुरक्षितेतासाठी वेग कमी ठेवावा लागतो. त्यामुळं वेळेचा अपव्यय होतो. मात्र या थिक वेब स्विच यंत्रणेमुळं लोकलचा वेग 50 किमीपर्यंत वाढेल. नवीन थिक वेब स्विच प्रणालीमुळं लोकल वेळेवर पोहोचण्यास मदत होणार आहे. तसंच, प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. या प्रणालीमुळं ट्रॅक बदलताना भागांची झीज कमी होते. तसंच, देखभाल आणि दुरुस्तीची आवश्यकता कमी भासते. 

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

विविध पुलांच्या गर्डर लाँचिंगसाठी शनिवारी आणि रविवारी मध्य रेल्वेवर ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे काही मेल/ एक्स्प्रेसचे मार्ग बदलले जाणार असून काही उपनगरीय सेवा रद्द करण्यात येणार आहेत.  विविध अभियांत्रिकी, सिग्नालिंग आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी मेगा ब्लॉक असणार आहे. सकाळी ९:३४ ते दुपारी ३:४०- २ ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान - जलद लोकल डाऊन धिम्या मार्गावर वळविल्या जातील. कळवा, मुंब्रा आणि दिवा 3 स्थानकावर या लोकल थांबतील. तसेच मेल-एक्स्प्रेस पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळविल्या जातील.

पश्चिम रेल्वे वाहतुकीत काय बदल?

शनिवारी मध्य रात्री १२:३० ते रविवारी पहाटे ४ - भाईंदर आणि वसई रोड स्थानकादरम्यान- काही गाड्या रद्द होतील. धिम्या गाड्या जलद मार्गावर वळवण्यात येतील