VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत

नेपाळमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मालिकेतील घटनेने क्रिकेट जगताचं वेधलं लक्ष, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती योग्य कि अयोग्य यावर सोशल मीडियातही चर्चा सुरु झाली आहे.

Updated: Feb 24, 2023, 09:08 PM IST
VIDEO: नेपाळच्या 'त्या' खेळाडूबरोबर हात मिळवण्यास नकार, स्कॉटलंडच्या खेळाडूंची कृती सोशल मीडियावर चर्चेत title=

Sandeep Lamichhane : नेपाळमध्ये ( Nepal) सुरु असलेल्या ट्रँग्यूलर क्रिकेट मालिकेतील (Nepal Tri Series 2023) एक घटना सध्या सोशल मीडियावर (Social Media) चांगलीच चर्चेत आहे. या स्पर्धेत स्कॉटलंडच्या (Scotland) खेळाडूंनी केलेल्या एका कृतीने क्रिकेट जगताचं लक्ष वेधून घेतलं आहे. या स्पर्धेत नेपाळ क्रिकेट संघाने (Nepal National Cricket Team) स्कॉटलंडविरुद्ध शानदार विजय मिळवला. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकामेकांशी हस्तांदोलन करत असताना स्कॉटलंडच्या खेळाडूंनी नेपाळचा फलंदाज संदीप लामिछानेबरोबर (Sandeep Lamichhane) हात मिळवण्यास नकार दिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत दोन्ही संघांचे खेळाडू सामना संपल्यानंतर एकमेकांशी हात मिळवताना दिसत आहेत. याचवेळी रांगेत असलेला संदीप लामिछानेसुद्धा खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी पुढे आला. संदीप आपल्या संघाच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करत पुढे सरकतो. पण जेव्हा स्कॉटलंडचे खेळाडू समोर येतात. तेव्हा त्यांनी संदीपशी हात मिळवणं टाळलं, इतकंच काय तर त्यांनी संदीपकडे बघितलंही नाही. 

संदीप लामिछानेवर बलात्काराचा आरोप
नेपाळ क्रिकेट संघाचा फलंदाज संदीप लामिछानेवर बलात्काराचा आरोप आहे. 17 वर्षांच्या एका मुलीने त्याच्यावर हा आरोप केला आहे. काठमांडू इथल्या एका हॉटेलमध्ये संदीपने बलात्कार केल्याचा आरोप त्या मुलीने केला. मुलीची वैद्यकीय तपासणी झाली आणि त्यानंतर संदीप लामिछानेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बलात्काराचा आरोप सिद्ध झाल्याने संदीपला अटक झाली. काही महिन्यांनंतर संदीपची जामिवावर सुटका झाली. इतकंच नाही तर नेपाळ क्रिकेट बोर्डाने त्याच्यावरचं निलंबनही हटवलं. 

यानतंर संदील लामिछानेला पुन्हा नेपाळ क्रिकेट संघात स्थान मिळालं. सध्या सुरु असलेल्या ट्रँग्युलर मालिकेतही त्याला नेपाळ संघात संधी देण्यात आली. संदीपला संघात स्थान दिल्याने नेपाळ क्रिकेट बोर्डावर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान आयसीसीने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.