भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज

IND VS ENG : पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने चांगली सुरूवात केली. सीरिजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या विजयानंतर आता सीरिजमधील दुसरा सामना हा चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

पुजा पवार | Updated: Jan 25, 2025, 12:23 PM IST
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या मॅच दरम्यान ढगाळ वातावरण? जाणून घ्या पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज title=
(Photo Credit : Social Media)

IND VS ENG T20 2nd Match :सध्या भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सीरिज सुरु असून यातील पहिल्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडियाने (Team India) चांगली सुरूवात केली. सीरिजमध्ये भारत 1-0 ने आघाडीवर आहे. या विजयानंतर आता सीरिजमधील दुसरा सामना हा चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. परंतु शनिवारी संध्याकाळी होणाऱ्या या सामन्यादरम्यान हवामान ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच चिदंबरम स्टेडियमवरील पिच स्पिनरच्या मदतीची ठरणार असल्याने टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये सुद्धा बदल होऊ शकतात. 

कसा आहे चेन्नईतील हवामानाचा अंदाज? 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसली तरी वातावरण ढगाळ असण्याची शक्यता आहे. २५ तारखेला आभाळात ढग दाटून येतील, तसेच कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 21 अंश सेल्सिअस इतकं असेल. चिदंबरम स्टेडियमवर 20 ओव्हरच्या सामन्यादरम्यान हवेची गती ही 13-17 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे, तर आर्द्रता 70-83 टक्के असेल.

कसा आहे पीच रिपोर्ट? 

वर्ष 2018 नंतर, या स्टेडियममधील हा पहिला आंतरराष्ट्रीय टी 20 सामना असल्याने येथील खेळपट्टीचा अंदाज बांधणे कठीण आहे. अधिकतर चेपॉकची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करण्यासाठी ओळखली जाते. 2024 मध्ये आयपीएलच्या सामन्यादरम्यान इथल्या पिचने सामान्यपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक मदत केली होती. पीच पाहून टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये दवचा खेळपट्टीवर परिणाम होणार नाही, त्यामुळे टॉस जिंकणारा संघ प्रथम फलंदाजी निवडेल. या मैदानावर पहिल्या इनिंगमधील सरासरी धावसंख्या 174 इतकी आहे. चेन्नई येथे झालेल्या T20I सामन्यात विजयासाठी दिलेल्या टार्गेटचा पाठलाग करणाऱ्या एका संघाने विजय मिळवला होता. 

हेही वाचा : Video : मॅच सुरु असताना खेळाडूंमध्ये तुफान राडा, एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या

 

स्पिनर गोलंदाजांवर असणार सर्वांचं लक्ष : 

कोलकातामध्ये झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सामन्याच्या पहिल्या सामन्यात स्पिनर गोलंदाज वरुण चक्रवर्ती याने आपल्या गोलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. त्याने इडन गार्डनवर झालेल्या सामन्यात चार ओव्हरमध्ये 23 धावा देऊन तीन विकेट्स घेतल्या. तसेच उपकर्णधार अक्षर पटेलने देखील गोलंदाजीत चांगले योगदान दिले होते. तेव्हा या गोलंदाजांकडून असाच कामगिरीची अपेक्षा दुसऱ्या सामन्यातही असेल.