रोहित-विराटमध्ये मतभेद? कर्णधार विराटला केलं मैदानाबाहेर!

टीम इंडिया ज्यावेळी फिल्डींग करण्यासाठी मैदानावर उतरली तेव्हा विराट लवकर मैदानावर पोहोचला.

Updated: Mar 6, 2022, 01:44 PM IST
रोहित-विराटमध्ये मतभेद? कर्णधार विराटला केलं मैदानाबाहेर! title=

मोहाली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टेस्ट सामना मोहालीच्या मैदानावर सुरु आहे. सामन्याचा आजचा तिसरा दिवस असून श्रीलंका फलंदाज मैदानावर आहेत. दरम्यान या सामन्यात एक मोठी घटना घडली. ज्यावेळी कर्णधार रोहित शर्मा मैदानातून विराटला पुन्हा बोलावलं.

विराट कोहलीसाठी हा सामना फार ऐतिहासिक आहे. कारण विराटचा हा 100 वा सामना आहे. टीम इंडिया ज्यावेळी फिल्डींग करण्यासाठी मैदानावर उतरली तेव्हा विराट लवकर मैदानावर पोहोचला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने त्याला गार्ड ऑफ ऑनर देण्यासाठी विराट कोहलीला पुन्हा मैदानावर बोलवून घेतलं. यावेळी ऋषभ पंतनेही रोहितला सपोर्ट करत मैदानाच्या बाहेर जाऊन पुन्हा आत येण्यास सांगितलं.

रोहितचं ऐकून कोहली मैदानाबाहेर जाऊन पुन्हा आता आला. यावेळी सर्व खेळाडूंनी त्याला गार्ड ऑफ ऑनर दिला. हा व्हिडीयो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. 

यावेळी विराट कोहलीनेही मैदानावर मजेत एंट्री घेतली. शिवाय त्याने सर्वांचे मानापासून आभार मानले. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधार रोहित शर्माला टाळी देत मिठी मारली आणि धन्यवाद म्हटलं. विराट कोहलीला गार्ड ऑफ ऑनर देण्यात आल्यानंतर मैदानात उत्साहाचं वातावरण पहायला मिळालं.

सामना सुरु होण्यापूर्वी मैदानावर विराट कोहलीसाठी खास सेरेमनी झाली. यावेळी टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड यांनी विराट कोहलीला टेस्ट कॅप देऊन सन्मान केला गेला. त्यावेळी विराटची पत्नी अनुष्का देखील त्याच्या सोबत होती.