IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा!

Ashwin single handed six Video: आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.

Updated: Dec 25, 2022, 05:55 PM IST
IND vs BAN: नॉर्मल वाटला व्हयं... Ashwin नं उभ्या उभ्या मारलाय सिक्स; बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा! title=
IND vs BAN, Ashwin

IND vs BAN 2nd Test:  टीम इंडियाने (Team India) रविवारी कसोटी मालिकेत बांग्लादेशला (India vs Bangladesh) क्लीन स्वीप दिला आहे. बांग्लादेश दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या सामन्यात 188 धावांनी विजय मिळवला होता, तर दुसरा सामना संघाने 3 गडी राखून यजमानांना धूळ चारली. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (World test championship) मार्ग सुखकर झाल्याचं पहायला मिळतंय. आजच्या सामन्याच्या हिरो राहिला तो आर आश्विन... (Ashwin single handed six crushed Bangladesh dreams in IND vs BAN 2nd Test marathi news)

बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. भारताच्या विजयात आर अश्विनने मोलाचं योगदान दिलं. या सामन्यात त्याने गोलंदाजीत एकूण 6 विकेट्स घेतल्या, तसेच भारताला विजयासाठी 70 हून अधिक धावांची गरज असताना आश्विनने 42 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे आश्विनचं सर्वत्र कौतूक होताना दिसतंय. मात्र, खास चर्चा होताना दिसते ती आश्विनच्या सिक्सची... (Ashwin one hand six)

आणखी वाचा - IND vs BAN: नाद करा पण आश्विनचा कुठं; पठ्ठ्यानं 34 वर्षांचा रेकॉर्ड मोडलाय!

पाच विकेट घेणारा बांग्लादेशचा मेहदी हसन (Mehidy Hasan) भारतीय फलंदाजांवर प्रभावी ठरत होता. त्याचवेळी आश्विने एक सिक्स खेचला आणि भारतीय चाहत्यांचं टेन्शन संपवलं. भारताच्या दुसऱ्या डावातील 46 वी ओव्हर सुरू होती. त्यावेळी आश्विन आणि श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) मैदानात होते. त्यावेळी भारताला सामना जिंकण्यासाठी 16 धावांची गरज होती. सामना रोमांचक स्थितीत पोहोचला होता.

दरम्यान, भारतावर प्रेशर येत असल्याचं लक्षात येताच आश्विनने (Ashwin one hand six on Mehidy Hasan bowling) मेहदी हसनला जोरदार षटकार खेचला. आश्विनचं रौद्ररूप पाहून बांग्लादेशच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं पहायला मिळालं. हा सिक्स आश्विनने एकहाती खेचला होता. त्यामुळे सिक्स जाईल ती कॅच होईल, अशी परिस्थिती बॉलने बॉड्री पार केली. त्यामुळे सध्या आश्विनची चर्चा होताना दिसत आहे.