नवी दिल्ली : भारतीय खेळाडू अरुणा रेड्डीने मेलबर्नमध्ये सुरु असलेल्या 2018 जिमनॅस्टिक वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन करत कांस्य पदक मिळवलं आहे.
अरुणा महिला वॉल्ड ईवेंटमध्ये तिसऱ्या स्थानी आली. कांस्य पदक जिंकल्यासोबतच जिमनॅस्टमध्ये मेडल जिंकणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. 22 वर्षाच्या या जिमनास्टने मेडल राउंडमध्ये 13.649 चा स्कोर केला. भारताची प्रांती नायक सहाव्या स्थानी राहिली.
अरुणा रेड्डी ही कराटे प्रशिक्षक आहे. 2005 साली तिने जिम्नॅस्टिक्समध्ये पहिले राष्ट्रीय पदक मिळवले. 2014 साली कॉम्न वेल्थ गेम्सच्या पात्रता फेरीत वॉल्ट अॅपराटसमध्ये अरुणाला 14 वे स्थान मिळाले होते. आशियाई स्पर्धेत तिने नववे स्थान मिळाले होते.
2017 साली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये अरुणाला वॉल्ट प्रकारात सहावे स्थान मिळाले होते. 2010 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये आशिष कुमारने जिम्नॅस्टिक्समध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. त्यानंतर 2016 मध्ये रिओ ऑलिम्पिक्समध्ये 52 वर्षानंतर प्रथमच दीपा करमाकर जिम्नॅस्टसाठी पात्र ठरली होती. त्यावेळी थोडक्यात तिचे पदक हुकले होते.