GT vs KKR: रिंकू सिंग याच्या कामगिरीवर अनन्या पांडे झाली फिदा; पोस्ट शेअर करत म्हणाली...

GT vs KKR IPL 2023: रिंकू सिंह या खेळीमुळे तो काही मिनिटात स्टार झाला. रिंकूच्या कामगिरीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. अनन्याने इन्टाग्रामवर (Ananya Pandey Instagram) स्टोरी शेअर केली.

Updated: Apr 10, 2023, 05:51 PM IST
GT vs KKR: रिंकू सिंग याच्या कामगिरीवर अनन्या पांडे झाली फिदा; पोस्ट शेअर करत म्हणाली... title=
Ananya Pandey On Rinku Shingh

GT vs KKR IPL 2023: रविवारी खेळला गेलेल्या डबल हेडरमधील पहिला सामना हा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात खेळवण्यात आला. सामना खऱ्या अर्थाने थरारक, रंगतदार आणि सनसनाटी राहिला. राशिदच्या भीमपराक्रमाला एका ओव्हरमध्ये छेद देणाऱ्या रिंकू सिंह (Rinku Singh) याचं नाव कालपासून चर्चेत आहे. अशातच आता रिंकूचं नाव मोठमोठ्या सेलिब्रेटीप्रर्यंत पोहोचल्याचं दिसतंय.

गुजरातने केकेआरला (KKR) विजयासाठी 205 रन्सचं टार्गेट दिलं होतं. गुजरात हा सामना आरामात जिंकणार असं जाणवत असताना 5 फूट 5 इंच उंचीच्या पठ्ठ्यानं सामना आरामात गुजरातच्या घशातून काढून घेतला. अखेरच्या ओव्हरला 29 धावांची गरज होती. त्यावेळी रिंकू स्टाईकला आला. कोलकाताला आता 5 बॉलमध्ये 28 धावांची गरज होती. कोलकाताच्या फॅन्सने तर आशाच सोडली. मात्र, रिंकूने 5 सिक्स खेचत अनेकांसाठी आभाळ ठेंगणं केलं.

VIDEO : 6,6,6,6,6... Rinku Singh ठरला KKR च्या विजयाचा हिरो; पाहा शेवटच्या ओव्हरचा थरार!

रिंकू सिंह या खेळीमुळे तो काही मिनिटात स्टार झाला. सोशल मीडिया सोडा आता भलेभले स्टार देखील रिंकूचं कौतूक करताना दिसतायेत. शाहरुख खानने (Shah Rukh Khan) देखील खास रिंकूसाठी ट्विट केलं. एवढंच काय तर आता रिंकूच्या कामगिरीवर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Pandey) फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. अनन्याने इन्टाग्रामवर (Ananya Pandey Instagram) स्टोरी शेअर केली. त्यावेळी तिने हात वर करत रिंकूवर स्तुतीसुमने उधळली.

पाहा पोस्ट -

दरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रिंकू सिंग नावाचं वादळ आलं आणि गुजरातची नौका समुद्रात बुडवली. शाहरुख खानची मुलगी सुहाना खानने (Suhana Khan) सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट शेअर करत रिंकू सिंगचं कौतूक केलं. तर, केंद्रा लस्टने (Kendra lust) देखील पोस्ट शेअर करत रिंकूवर कौतूकाचा वर्षाव केलाय.