एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू आज चालवतोय ऑटो रिक्षा

एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू पोटासाठी म्हशी राखत असल्याची बातमी यापूर्वी आपण वाचली असेल. आता आणखी एका खेळाडूबाबत अशीच बातमी आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू आज पोटासाठी चक्क ऑटो रिक्षा चालवून आणि टेलरींगचा व्यवसाय करून पोट भरतो आहे.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Oct 29, 2017, 10:50 AM IST
एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू आज चालवतोय ऑटो रिक्षा title=

नवी दिल्ली : एकेकाळचा स्टार क्रिकेटपटू पोटासाठी म्हशी राखत असल्याची बातमी यापूर्वी आपण वाचली असेल. आता आणखी एका खेळाडूबाबत अशीच बातमी आली आहे. एकेकाळी लोकप्रिय असलेला हा क्रिकेटपटू आज पोटासाठी चक्क ऑटो रिक्षा चालवून आणि टेलरींगचा व्यवसाय करून पोट भरतो आहे.
 
 क्रिकेट हा अलिकडील काळात प्रचंड पैसा आणि प्रसिद्धी मिळवून देणारा खेळ. त्यामुळे आजकाल गरीब क्रिकेटपटू मिळणे म्हणजे समूद्रात सुई शोधण्याचा प्रकार. पण, एक काळ असाही होता की, क्रिकेट खेळ लोकप्रिय होता पण, त्यातून पैसा मिळत नव्हता. या कठीण काळात जे क्रिकेटपटू निवृत्त झाले त्यांच्यावर आज वाईट दिवस असल्याचे दिसते. भारतातील खेळाडूंबाबत हे विधान करता येत नाही. पण, भारताचा शेजारी पाकिस्तानमध्ये मात्र नक्कीच अशी स्थिती आहे. या खेळाडूंकडे विक्रम आणि धडाकेबाज कामगिरीचा इतिहास वगळता हाती काहीच नाही.
 
शाहिद अफ्रिदी, वासीम अहमद, शोएब अख्तर यांच्यासारखे, इम्रान खान यांच्यासारखे काही दिग्गज खेळाडू वगळता पाकिस्तानातीह क्रिकेटपटूंची स्थिती प्रचंड वाईट आहे. इतकी की अत्यंत सुमार दर्जाची आणि कष्टाची कामे करून या खेळाडूंना आपले पोट भरावे लागत आहे. सध्या पाकिस्तानात क्रिकेटच मोहम्मद यूसूफ आणि अरशद खान या दोन खेळाडूंची जोरदार चर्चा आहे. दोघांनीही पाकिस्तानच्या संगातून क्रिकेट खेळताना चांगली कामगिरी केली आहे. पण, आज ना त्यांच्याकडे चाहत्यांचे लक्ष आहे ना तेथील सरकारचे.

क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यावर हे दोन्ही खेळाडू आपल्या परिवाराचा भार वाहण्यासाठी मेहनत करत आहेत. ते पोट भरण्यासाठी कधी टेलर म्हणून कपडे शवत आहेत तर, कधी ऑटो रिक्षा चालवून गुजराण करीत आहेत. अरशद खानबाबत बोलायचे तर, बेअब्रू होण्याच्या भीतीने ते ऑस्ट्रेलियाला गेले आहेत. तेथे जाऊन ते टॅक्सी चालवत आहेत.