Flax seeds and mik: लहान मुलांपासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांसाठीच दूध हे आरोग्यवर्धक ठरते. दुधाला एका प्रकारे पूर्णअन्न म्हणतात कारण दुधामध्ये मानवी शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सगळी पोषक तत्वे असतात. त्यामुळे दूध हे नेहमीच फायदेशीर ठरणारे पेय आहे. दुधामध्ये जवस मिसळून प्यायल्याने अनेक शारीरिक फायदे पाहायला मिळतात.
बऱ्याच लोकांसाठी, दूध पिणे जीवनाचा रुटीन असू शकतो. पण योग्य पद्धतीने दुधाचे सेवन केले तर तो उत्तम पर्याय ठरू शकतो. जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, फायबर, प्रोटीन आणि व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स यांसारखे पोषक घटक असतात, जे शरीराला अनेक फायदे देतात.
जवसाच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. हे रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयविकाराचा (heart attack) धोका कमी करण्यास मदत करू शकते. जर तुम्ही नियमित दूधात जवस घालून प्याल तर हृदय खूप मजबूत होते.
जवसांमध्ये फायबर असते, जे पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. हे बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर पाचन समस्या दूर करण्यात मदत करू शकते. जवस दूधात मिसळून पिणे केवळ हृदयासाठीच नाही तर पचनसंस्थेसाठीही खूप फायदेशीर आहे.
जवसांमध्ये फायबर आणि प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. हे वजन कमी करण्यासाठी खूप महत्त्वाचे पदार्थ आहे. हे भुकेला नियंत्रित करते आणि चयापचनास चालना देते. यासाठी कोमट दुधात जवस टाकून प्यायल्याने झटपट वजन कमी होण्यास मदत होते. कित्येक सेलीब्रिटी वजन कमी करण्यासाठी त्यांच्या डायट प्लानमध्ये जवस आणि दुधाचा समावेश करतात.
जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड असते, जे मानसिक आरोग्य सुधारते. हे तणाव, चिंता आणि नैराश्य सुधारण्यास मदत करू शकते. यामध्ये व्हिटॅमिन बी सुद्धा चांगल्या प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करते.
जवस आहारात घेण्यापूर्वी हे लक्षात घ्या की जवसाचे अति सेवन केल्याने बहुतेकदा मोठे दुष्परिणाम होतात. जसे की ओमेटिंग होणे, पोटदुखणे, त्वचेची एलर्जी अशा अनेक समस्या उद्भवतात. जवसांचे गुणधर्म गरम असते, त्यामुळे त्याचे योग्य प्रमाणात सेवन केले पाहिजे.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)