मुंबई : साधारणपणे हिंदू धर्म मानणारे प्रत्येक लोक आपल्या घरात तुळशीचे रोप लावतात. अनेक घरांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा केली जाते. हिंदू मान्यतेनुसार तुळशीला खूपच महत्व आहे. देवाच्या पूजेच्यावेळी देखील तिला देवासमोर ठेवलं जातं. तुळशीच्या रोपाबद्दल अशी श्रद्धा आहे की, ते भगवान श्रीकृष्णाचे रूप आहे. भगवान श्रीकृष्णाला तुळशी प्रिय आहे असे मानले जाते. ही धार्मिक श्रद्धा लक्षात घेऊन अनेकजण दररोज सकाळी तुळशीची पूजा करतात आणि तिच्या सोमर दिवा देखील लावतात. एवढेच काय तर संध्याकाळी देखील अनेकजण तुळशी समोर दिवा लावतात.
परंतु तुम्हाला माहितीय का, की वास्तुशास्त्रातही तुळशीशी संबंधित अनेक नियम सांगितले आहेत. चला जाणून घेऊया तुळशीशी संबंधित काही खास नियम.
तुळशीच्या झाडाला पाणी देण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहे, तसेच यामुळे पुण्य मिळते आणि लोकांचे दारिद्रय दूर होते असं सांगितलं जातं. परंतु असे असले तरी धार्मिक मान्यतेनुसार एकादशी, रविवार, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या दिवशी तुळशीला पाणी देवू नये.
एका मान्यतेनुसार संध्याकाळनंतर तुळशीची पाने तोडणे देखील निषिद्ध आहे. असे केल्याने दोष येतो असे मानले जाते. त्यामुळे काही लोक असे करणे टाळतात.
मान्यते नुसार जो कोणी गुरुवारी तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करतो आणि रविवार सोडून दररोज संध्याकाळी तुळशीच्या खाली तुपाचा दिवा लावतो, त्याच्या घरात मां लक्ष्मीचा वास असतो.
वाळलेल्या तुळशीचे रोप घरात कधीही ठेवू नये अशी धार्मिक मान्यता आहे. वास्तविक ते अशुभ मानले जाते. वाळलेल्या तुळशीचे रोप पवित्र नदीत विसर्जित करून त्या जागी नवीन रोप लावावे.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीची लागवड दक्षिण दिशेला केली जात नाही. असे मानले जाते की, या दिशेला लावलेली तुळशी नेहमीच अशुभ फल देते.
तुळशीची लागवड करण्यासाठी उत्तर दिशेचा वापर केला जातो. याशिवाय तुळशी नेहमी भांड्यात घेतली जाते. घरामध्ये जमिनीवर लावलेले तुळशीचे रोप अशुभ फल देते असे म्हणतात.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)