Surya Gochar 2023 : तब्बल 1 वर्षांनी स्वगृही सूर्याचं गोचर! 'या' राशींवर सूर्य ओकणार आग

Surya Gochar 2023 : सूर्य कर्क राशीतून निघून सिंह राशीत प्रवेश करणार आहे, ज्यामुळे या 5 राशींसाठी अडचणी वाढणार आहे.    

नेहा चौधरी | Updated: Aug 17, 2023, 05:25 AM IST
Surya Gochar 2023 : तब्बल 1 वर्षांनी स्वगृही सूर्याचं गोचर! 'या' राशींवर सूर्य ओकणार आग title=
surya gochar 2023 sun transit in leo negatively impact 5 zodiac sign

Surya Gochar 2023 : सूर्यदेव हा ग्रहमंडलातील सर्वात शक्तिशाली ग्रह आहे. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, पिता, पुत्र, हाड, सरकारी कामं, यश, तेज, प्रसिद्धी आणि प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टींचा तो कारक आहे.  ग्रहांचा अधिपती सूर्यदेव कर्क राशीचा प्रवास पूर्ण करुन आज दुपारी 1.32 वाजता स्वतःच्या राशीत सिंह राशीत गोचर करणार आहे. सूर्य स्वगृही एक महिना विराजमान राहणार आहे. 17 सप्टेंबरला दुपारी 1.30 वाजता सूर्यदेव सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.  सूर्य गोचरमुळे 12 राशींवरही परिणाम होणार आहे. काही राशींसाठी सूर्यदेव सुवर्ण काळ घेऊन आला आहे तर काही राशींसाठी पुढील एक महिना संकटाचा असणार आहे. 

 'या' राशींवर सूर्य ओकणार आग

मिथुन  (Gemini)

या राशीच्या लोकांना शारीरिक समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तुमच्या प्रेमाच्या नात्यात तणाव निर्माण होणार आहे. वादावादी आणि भांडण होण्याची शक्यता आहे. हट्टीपणामुळे नाते तुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे भांडण टाळा तरच नातं टिकेल. व्यावसायिकांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. या लोकांना कर्ज काढण्याची वेळ येऊ शकते. कामामध्ये उशीर लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी निराशा झाल्यामुळे नवीन नोकरीचा शोध घ्यावा लागणार आहे. 

कर्क (Cancer)

सूर्य गोचरमुळे कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात वादळ येणार आहे. शिवाय जोडीदाराची तब्येत गडबडणार आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना पुढील एक महिना कठीण असणार आहे. त्यांना सावध राहावं लागणार आहे. अगदी तुमच्या पार्टरनशी वाद होऊ शकता. आजारी व्यक्ती रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होणार आहे. त्यामुळे त्यांना बरं होण्यास वेळ लागणार आहे. 

धनु (Sagittarius)

या राशीच्या लोकांसाठी लव्ह लाइफमध्ये काही अडचणी येणार आहे. जोडप्यामधील विचारांमधील विरोधाभासामुळे प्रॉब्लेम वाढणार आहे. विद्यार्थ्यांसाठी पुढील महिनाभर चांगला नसणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. पचन, आम्लपित्तची समस्या होऊ शकते. 

कुंभ (Aquarius) 

या राशीच्या लोकांसाठी सूर्य गोचर कठीण काळ घेऊन आला आहे. त्यांचा आत्मविश्वास कमजोर होणार आहे. तुमच्या स्वभावात आक्रमकता आणि अहंकार असणार आहे. पुढील महिन्याभर तुम्ही बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात वादळ येणार आहे. जोडीदारासोबत मतभेद होणार आहे. डोळ्याची समस्या निर्माण होणार आहे. त्यामुळे डोळ्यांची काळजी घ्या. 
 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी सूर्याच्या राशीतील बदलामुळे संकट येणार आहे. ऊर्जेच्या कमतरतेमुळे मन अस्वस्थ होणार आहे. व्यायाम आणि पौष्टिक आहारावर भर द्या. मित्रांमधील अहंकाराच्या संघर्षामुळे तुमच्या आयुष्यात काही समस्या उद्भवणार आहे. पुढील एक महिन्यात स्पष्ट बोला. भावनिक असंतुलनामुळे, तुम्हाला कधीकधी एकटेपणा वाटणार आहे.  तुम्ही ज्या लोकांवर विश्वास ठेवला ते विश्वासघात करणार आहेत. 

हेसुद्धा वाचा - Vashi Rajyog : सूर्य गोचरमुळे सिंह राशीत दुर्मिळ वाशी राजयोग! 'या' लोकांचा सुवर्ण काळ

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)