Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग

Kalatmak Yog : ज्योतिष शास्त्रात शुक्र आणि चंद्र हे दोन्ही सौम्य स्वभावाचं ग्रह मानले जातात. अशावेळी जेव्हा हे दोन ग्रह एकत्र येतात तेव्हा अतिशय लाभदायक असा कलात्मक योग तयार होतो.  या राजयोगामुळे काही राशींचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे.     

नेहा चौधरी | Updated: Aug 11, 2023, 07:25 PM IST
Kalatmak Yog : 'या' राशींच्या नशिबात 13 ऑगस्टपासून पैसाच पैसा! चंद्र आणि शुक्र युतीमुळे कलात्मक योग   title=
shukra chandrama yuti kalatmak yog gajlakshmi rajyog lucky for 6 zodiac signs money will rain

Shukra Chandrama Yuti/Kalatmak yog : वैदिक ज्योतिषशास्त्रात सर्वात संथ गतीने शनीदेव आपली रास बदलतो. म्हणजे तो एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. तर चंद्र सर्वात वेगवान प्रकारे आपले स्थान बदलतो. अडीच दिवसात चंद्र एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करतो. जेव्हा एखाद्या जाचकाच्या कुंडलीत चंद्र आणि शुक्र हे सौम्य स्वभावाचे ग्रह एकत्र येतात तेव्हा कलात्मक योग तयार होतो. या योगामुळे करिअर आणि व्यवसायात अमाप प्रगती आणि यश मिळतं.  (shukra chandrama yuti kalatmak yog gajlakshmi rajyog lucky for 6 zodiac signs money will rain)

 

पंचांगानुसार 13 ऑगस्टला म्हणजे येत्या सोमवारी चंद्र कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत आधीपासून शुक्र ग्रह विराजमान आहे. त्यामुळे कर्क राशाती चंद्र आणि शुक्र यांची युती होणार आहे.  13 ऑगस्टला पहाटे 4.25 वाजता चंद्रही कर्क राशीत गोचर करणार आहे. तर 16 ऑगस्टला सायंकाळी 4.47 पर्यंत चंद्र कर्क राशीत असणार आहे. 

कर्क (Cancer)

कलात्मक योग या राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या राशीत शुक्र चढत्या घरामध्ये प्रतिगामी आहे त्यामुळे या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग लाभदायक सिद्ध ठरणार आहे. या सव्वा दोन दिवसात कुटुंबांचे सहकार्य लाभणार आहे. आर्थिक प्रगती होणार आहे. नवीन कामासाठी हा योग शुभ आहे.

मिथुन (Gemini)

शुक्र आणि चंद्राच्या संयोगाने तयार झालेला कलात्मक योग या राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. यशाचा मार्ग मोकळा होणार आहे. परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दीर्घकाळ रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. व्यवसायात तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला आता मिळाला सुरुवात होणार आहे.  समाजात मान-सन्मान वाढणार आहे. 

मकर (Capricorn)

या राशीच्या लोकांसाठी कलात्मक योग खूप लाभदायक ठरणार आहे. कौटुंबिक सहकार्य लाभणार आहे. दीर्घकाळ चाललेल्या समस्याही तुमच्यापासून दूर पळणार आहे. जोडीदारासोबत अधिक खर्च होणार आहे. काळजी करण्याची गरज नाही उत्पन्नाचं नवीन स्त्रोत निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे आर्थिक लाभासोबत पदोन्नती मिळणार आहे. 

शुक्र गोचरमुळे गजलक्ष्मी राजयोग!

वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रह विलास, संपत्ती, वैभव, भौतिक सुखाचा कारक मानला जोत. ऑक्टोबरच्या सुरुवातीला शुक्र सिंह राशीत गोचर करणार आहे. सध्या शुक्र कर्क राशीत असून गजलक्ष्मी आणि जकेसरी राजयोग तयार झाला आहे. 

तूळ (Libra)

शुक्राचे संक्रमण या राशीच्या लोकांना भाग्यशाली ठरणार आहे. उत्पन्नात प्रचंड प्रमाणात वाढ होणार आहे.  उत्पन्नाचे नवीन स्रोत प्राप्त होणार आहे. त्याचबरोबर जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. तुम्हाला कुठूनतरी रखडलेले पैसे परत मिळणार आहे त्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहे. तुमच्या आखलेल्या योजना यावेळी यशस्वी होणार आहे. जे लोक संशोधन क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांच्यासाठी हा राजयोग अतिशय भाग्यशाली ठरणार आहे. 

कुंभ (Aquarius)

शुक्राचा राशी बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. पाटर्नशीपच्या कामात चांगला फायदा होणार आहे. अविवाहित लोकांना चांगले प्रस्ताव येणार आहे. वैवाहिक जीवनात रोमान्स येणार आहे. जोडीदाराची प्रगती होणार आहे. भाग्य तुमच्या असणार आहे. यावेळी तुम्ही कोणतीही लक्झरी वस्तू खरेदी करणार आहात.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)