खूपच आकर्षक असतात 'या' व्यक्ती, त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही

अंकशास्त्रात, संख्येला महत्वाचं स्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचा मुल्यांक हा त्याच्या जन्म तारखेच्या आधारे काढला जातो.

Updated: Apr 18, 2022, 06:22 PM IST
खूपच आकर्षक असतात 'या' व्यक्ती, त्यांना श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही title=

मुंबई : अंकशास्त्रात, संख्येला महत्वाचं स्थान आहे. कोणत्याही व्यक्तीचा मुल्यांक हा त्याच्या जन्म तारखेच्या आधारे काढला जातो. तसेच हा मूलांक फक्त त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व सांगते. वास्तविक, अंकशास्त्रात, 1 ते 9 पर्यंत सर्व मूलांक संख्या असलेल्या लोकांची वैशिष्ट्ये सांगितली आहेत. यासोबतच त्याच्या भविष्याबाबत काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यानुसार मूलांक 6 च्या लोकांमध्ये असे काही गुण असतात, ज्यामुळे ते अतिशय आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे मालक बनतात.

आता मुल्यांक 6 हा कोणत्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तींसाठी आहे आणि तो काय सांगतो, हे जाणून घेऊ.

कोणत्याही महिन्याच्या 6, 15 आणि 24 तारखेला जन्मलेल्या लोकांचा मूलांक 6 असतो. मूलांक 6 चा स्वामी हा शुक्र ग्रह आहे. शुक्र ग्रह सौंदर्य, प्रणय, आकर्षण, संपत्ती, भौतिक सुखाचा कारक आहे. शुक्र ग्रहाच्या प्रभावामुळे मूलांक 6 चे लोक खूप आकर्षक असतात.

मुल्यांक 6 असलेले लोक वाढत्या वयासोबत अधिक आकर्षक बनतात. त्यांचा स्वभावही मजेशीर असतो, तसेच ते नेहमीच मनाने चांगले असतात, ते कधीही दुसऱ्याचं वाईट चिंतीत नाहीत. ते लोकांशी अशा पद्धतीने वागता की, पहिल्याच भेटीत लोक त्यांच्यापासून इम्प्रेस होतात.

हे लोक मेहनती आणि हुशारही असतात. तसेच, त्यांना लक्झरी लाइफ जगण्याची आवड आहे. या लोकांना फक्त महागड्या वस्तू आवडतात. हा छंद पूर्ण करण्यासाठी हे लोक लहान वयातच मोठी ध्येये ठेवून त्यांचा पाठलाग करू लागतात.

जर या लोकांनी चित्रपट, मीडिया, ग्लॅमर, दागिने, कपडे या क्षेत्रांमध्ये काम केलं, तर त्यांना भरपूर यश मिळते.

अंक कुंडलीनुसार, मूलांक 6 चे लोक त्यांच्या मेहनत, बुद्धिमत्तेच्या जोरावर खूप यशस्वी होतात आणि भरपूर पैसा कमावतात. हे लोक त्यांच्या आयुष्यात खूप पैसा गोळा करतात. या लोकांसाठी हलका निळा, हलका गुलाबी आणि पांढरा रंग शुभ आहे.

(विशेष सूचना:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)