Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा करण्यात येतो. यंदा मकर संक्रांती 15 जानेवारी 2024 साजरी करण्यात येणार आहे. मकर संक्रांतीला असंख्य लोक आवर्जून काळे रंगाचे कपडे परिधान करतात. कारण शास्त्रानुसार मकर संक्रांतीला काळा रंग शुभ मानला जातो. यंदा मकर संक्रांतीला कुठल्या रंगाची साडी परिधान करणं शुभ असेल आणि कुठल्या रंगाची साडी चुकूनही परिधान करु नयेत, याबद्दल ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्याशिवाय मकर संक्रांतीला बांगड्या घालताना कुठली चुकू टाळावी तेही जाणून घ्या. (Makar Sankranti 2024 Dont wear black color sarees and this color bangles on Makar Sankranti)
यंदा मकर संक्रांतीला 5 रंगाचे कपडे किंवा साड्या तुम्ही नेसू शकतात. हे पाच रंग यंदा मकर संक्रातीत शुभ मानले गेले आहेत. मकर संक्रातीला हळदी कुंकूचा कार्यक्रम असल्यास तुम्ही हिरव्या रंगाची साडी नेसू शकता. हिरवा रंग हा सुवासिनीचा रंग किंवा सौभाग्याच प्रतिक मानला जातो. दुसरा शुभ रंग आहे तो म्हणजे लाल. हा रंगदेखील सौभाग्यच प्रतिक मानलं जातो. शुभ कार्यासाठी लाल रंगाचं वस्त्र वापरलं जातं. पूजा मांडणी असो किंवा मार्गशीर्ष गुरुवारची पूजा असो यासाठी चौरंग किंवा पाटावर लाल रंगाचं वस्त्र परिधान केलं जातं. पुढच्या रंग आहे तो म्हणजे गुलाबी. हा रंग प्रसन्नतेचं प्रतिक मानलं जातं. यानंतरचा शुभ रंग आहे केशरी. हा रंग सकात्मकतेचं प्रतिक असल्याने तुमच्याकडे केशरी रंगाची साडी असेल तर तुम्ही परिधान करा. त्याशिवाय पिवळ्या रंगाची साडीही तुम्ही नेसू शकता. पिवळा रंग हा नकारात्मक गोष्टीपासून आपलं संरक्षण करतं.
मकर संक्रांती आली की देवीचं वाहन आणि कुठल्या रंगाच वस्त्र परिधान करुन आली आहे, यावर चर्चा होते. कारण ज्या रंगाची साडी परिधान करुन देवी आली असते, तो रंग मकर संक्रांतीमध्ये वर्ज्य असतो. यंदा संक्रांती देवी ही काळा रंगाची साडी नेसून घोड्यावर येणार असल्याने यंदा आपण संक्रांतीमध्ये काळा रंगाची साडी किंवा कपडे परिधान करु शकत नाही. त्यामुळे यंदा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी गडद रंगाचे कपडे परिधान करायचे आहेत.
बांगड्या घालताना कायम हिरव्या रंगाच्या बांगड्यांना प्राधान्य द्या. त्यानंतर तुम्ही लाल रंगाच्या बांगड्या घालू शकता. इतर रंगांच्या बांगड्या मकर संक्रांतीमध्ये घालू नका. मकर संक्रांत हा सौभाग्याचा सण असल्याने हिरव्या किंवा लाल रंगाच्या बांगड्या परिधान कराव्यात. मकर संक्रांतीला बांगड्या भरताना एका हातात एक बांगडी अधिक घालावी. त्याशिवाय मकर संक्रांतीला लाखेच्या बांगड्याला महत्त्व आहे. त्यामुळे यंदा नक्की लाखेच्या बांगड्या नक्की घाला.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)