मुंबई : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी ही खुशखबर आहे. आता, रिलायन्स जिओ वापरण्यासाठी तुमच्याकडे केवळ 4G सपोर्टिव्ह फोन असणं गरजेचं नसेल... तर 2G, 3G फोनमध्येही तुम्ही 'रिलायन्स जिओ' कार्डचा वापर करू शकाल.
कंपनीनं आपलं 2G, 3G फोन सपोर्टिव्ह डिव्हाईस बाजारात उपलब्ध असल्याचं जाहीर केलंय. जियोफाय 4G पोर्टेबल व्हाईस आणि डेटा डिव्हाईस आहे... हे हॉटस्पॉटच्या रुपात काम करतं. यामुळे फोन कॉलसोबतच व्हिडिओ कॉल आणि जिओच्या सगळ्याच अॅप्सचा वापर केला जाऊ शखतो. म्हणजेच, ग्राहकांकडे 4G सपोर्टिव्ह स्मार्टफोन नसेल तरी ते रिलायन्स जिओचा वापर करू शकतील.
यासाठी ग्राहकांना जियोफाय सिम घेऊन 2G, 3G सपोर्टिव्ह फोनBJ जिओ4जीव्हाईस अॅप्लीकेशन डाऊनलोड करून जिओ नेटवर्कशी कनेक्ट करावं लागेल.
रिलायन्स जिओच्या ग्राहकांची संख्या आत्तापर्यंत पाच करोडहून अधिक झालीय. कंपनीनं ३१ मार्च २०१७ पर्यंत आपल्या सर्व सेवा मोफत देणार असल्याचं जाहीर केलंय.