BSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर

रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे.  २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.

Updated: Dec 6, 2016, 06:51 PM IST
BSNL ची नवी अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर title=

नवी दिल्ली : रिलायन्सच्या जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएल ( BSNL) जोरदार तयारी करत आहे.  २०१७ या नवीन वर्षाच्या सुरुवातीला १४९ रुपयांत अनलिमिटेड लोकल आणि STD कॉलिंग ऑफर देणार आहे.

बीएसएनएल आपल्या ग्राहकांना खूश करण्यासाठी  येत्या १ जानेवारीपासून बीएसएनएल १४९ रुपयांच्या नव्या टॅरिफ प्लानची घोषणा करण्याची शक्यता आहे. जिओच्या प्लानमध्ये २८ दिवसांसाठी १४९ रुपयांमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉल्स, ३०० एमबी डेटा आणि १०० लोकल आणि नॅशनल एसएमएस मिळत आहेत. 

 बीएसएनएल मासिक १४९ रुपयांमध्ये ग्राहकांना देशांतर्गत कोणत्याही नेटवर्कशी अमर्याद व्हॉइस कॉल्स देण्याच्या प्लान देणार आहे. या प्लानमध्ये ३०० एमबीचा डेटाही असेल.

रिलायन्सने ५ सप्टेंबरला जिओ लॉन्च करत पहिल्या ३ महिन्यांसाठी वेलकम ऑफर म्हणून फ्री व्हॉइस कॉल्स आणि फ्री डेटाची घोषणा केली होती. ही ऑफर आता ३१ मार्च २०१७ पर्यंत वाढवण्यात आली आहे. आता BSNL नवीन ऑफर देत असल्याने आणखी काही कंपन्याही या स्पर्धेत उतरण्याची शक्यता आहे.