आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ...

भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी दिग्गज मोबाईल कंपनी अॅपल नवा धमाका करणार आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल त्यांना कमी किमतीत आयफोन 5 एस मिळणार आहे, कारण अॅपलने किमतीत मोठी घट केलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: May 10, 2017, 03:52 PM IST
आता आयफोन 5 एस असेल तुमच्या खिशात, किंमत फक्त ... title=

मुंबई : भारतीय स्मार्टफोन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी दिग्गज मोबाईल कंपनी अॅपल नवा धमाका करणार आहे. ज्यांना आयफोन खरेदी करायचा असेल त्यांना कमी किमतीत आयफोन 5 एस मिळणार आहे, कारण अॅपलने किमतीत मोठी घट केलेय.

एका रिपोर्टनुसार अॅपल कंपनी भारतात 15 हजार रुपयांत आयफोन 5 एसची विक्री करु शकते. मोबाईलची किंमत कमी करण्यामागे भारतात मोठ्या प्रमाणात बाजारपेठे काबिज करण्याचा विचार आहे. तसेच अॅपल कंपनी दिवाळीपर्यंत भारतात ऑनलाईन स्टोअर्स सुरु करण्याची शक्यता आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार कंपनीने आधी वितरकांना याची माहिती दिली आहे. आयफोन 5 एस केवळ ऑनलाईन उपलब्ध असेल. मात्र, रिटेल दुकानांत कमी प्रमाणात तो उपलब्ध असेल. भारतात आयफोन 5 एसची किंमत 18,000 रुपये आहे.

या फोनमध्ये टच आयडी फिंगरप्रिंटबरोबर पहिला स्मार्टफोन होता. 64 बिट प्रोसेसरचा पहिला स्मार्टफोन होता. आता आयफोन अॅपल लेटेस्ट जेनरेशन ios 10 वर रन होईल.  यात A7 प्रोसेसर असेल. याचा बॅक कॅमेरा 8 मेगापिक्सेल आणि 4 इंच रेटिना डिस्प्ले असणार आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x