ऑनलाइन खरेदीवर ८००० रुपये स्वस्त आयफोन ५एस

 आयफोन ६ च्या लॉन्चच्या ठिक अगोदर अॅपलने जी मार्केट स्ट्रॅटजी स्वीकारली आहे ती सॅमसंग आणि सोनीला महागात पडू शकते. 

Updated: Sep 4, 2014, 08:31 PM IST
ऑनलाइन खरेदीवर ८००० रुपये स्वस्त आयफोन ५एस title=

नवी दिल्ली:  आयफोन ६ च्या लॉन्चच्या ठिक अगोदर अॅपलने जी मार्केट स्ट्रॅटजी स्वीकारली आहे ती सॅमसंग आणि सोनीला महागात पडू शकते. 

अॅपलने ऑनलाइनमध्ये दिग्गज असलेल्या काही कंपन्यांना आपल्या लेटेस्ट आयफोन ५एसच्या खरेदीवर १५०० ते २००० हजारांपेक्षा अधिकचे मार्जिनची ऑफर केली आहे. त्यामुळे सामन्य स्टोअर पेक्षा हा फोन ऑनलाइन ८ हजारांनी स्वस्त पडणार आहे. 

ही ऑफर अॅपलने फ्लिपकार्ट, अमेझॉन आणि स्नॅपडीलसारख्या इ-कॉमर्स साइटवर दिली आहे. आयफोन-६ लॉन्च करण्यापूर्वी आयफोन ५एसचा सर्व स्टॉक संपविण्यासाठी या नव्या ऑफरची अॅपलला मदत होणार आहे. 
या गॅजेट कंपनीचे ट्रेड पार्टनर्सने दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन विक्रीने या कॅटेगरीतील इतर फोनच्या तुलनेत सर्वाधिक फायदा देणारा फोन ठरणार आहे. 

आयफोन ५एसचा १६ जीबी फोन ऑनलाइन ३८ ते ३९ हजार रुपयांना मिळतो. स्टोर्समध्ये त्याची किंमत ४६ ते ४७ हजार रुपये आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.