www.24taas.com, लंडन
निसर्गाने मानवी शरीरची रचना अद्भुत प्रकारे केली आहे. मानवी शरीर हे एक प्रकारचे आश्चर्यच आहे. निसर्गाने बनवलेल्या या शरीराला पूर्वी कुठलाही अपाय होत नव्हता. पण सध्याच्या स्थितीमुळे मानवी शरीराला असंख्य रोगांनी ग्रासले आहे. स्थूलपणा ही त्यांपैकी एक सर्वात मोठी समस्या मानवासमोर आज उभी आहे. अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की स्थूलपणा ही काही गंभीर समस्या नाही, पण या समस्येमुळे मधुमेह, हृदयविकार, गुडघे दुखणे आणि वाढत्या वयाचे आजार होऊ शकतात.
अभ्यासकांचं असं म्हणणं आहे, की जाडेपणा ही काही गंभीर समस्या नाही. आठवड्यातील केवळ ४५ मिनिटे पायी चालून स्थूलपणावर मात करू शकता. डॉ. राममनोहर लोहिया इस्पितळातील आहारतज्ज्ञ डॉ. शिखा खन्ना यांनी सांगितलं, की जाडेपणा ही २१व्या शतकाला आधुनिक जीवनशैलीने दिलेली देणगी आहे. त्यामुळे स्वतःच्या जीवनशैलीने बदल केल्यानंतरच जाडेपणापासून मुक्ती मिळेल. डॉ. शिखा स्थूलपणाने ग्रासलेल्या व्यक्तींना सल्ला देतात, की केवळ ४५ मिनिटे जलद चालण्याने फक्त जाडेपणा तर कमी होईलच, पण याच बरोबर भविष्यात होणाऱ्या अन्य रोगांपासूनही सुटका होईल.
पायी चालल्याने किंवा जॉगिंग केल्याने कुठल्याही व्यक्तीला फायदा होऊ शकतो. पण एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाब किंवा हृदयविकार असेल तर जॉगिंग सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. जुन्या दिल्लीमधील एनर्जी जिम से संचालक सुभास वर्मा सांगतात, की पायी चालणे हा असा एकमेव व्यायाम आहे की ज्यात कोणत्याही प्रकारचा खर्च होत नाही, त्यासाठी फक्त चांगल्या दर्जाचे फूटवेअर्स पायात असणं आवश्यक आहे.