www.24taas.com, झी मीडिया, ठाणे
काँग्रेसमध्ये आपणाला डावलले जात असल्याची खंत उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बोलून दाखवलीय. ठाण्यामध्ये काँग्रेस सेवादलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेस माझाही सेवादल करण्याच्या बेतात आहे... पण तरीही मी गप्प बसणार नाही. माझ्यावर राख साचू देणार नाही. निखारा हा निखाराच राहिला पाहिजे, असे राणेंनी यावेळी स्पष्ट केलं.
मी माझ्यावर कधीही राख साचू देणार नाही. तर निखाराच कायम राहील. काँग्रेसने प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना पदे दिली पाहिजेत. त्यांचा मान ऱाकला पाहिजे. सेवादलाच्या कार्यकर्त्याला सत्तेत स्थान दिले पाहिजे. त्यावेळी डोळ्यासमोर सेवादलाचाच कार्यकर्ता असेल, असे ते म्हणालेत.
काँग्रेस कार्यकर्ते एकमेकांना टार्गेट करतात. ही टीका योग्य नाही. एखादी व्यक्ती पदावरून जाऊन मी कधी येईन, याची वाट पाहिली जाते. कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेना, भाजपवर टीका करावी. कोणी टीका करण्यासाठी नसेल तर राष्ट्रवादीवरही टीका करा, असा सल्ला कार्यकर्त्यांना देताना काँग्रेसवर टीका करू नका, असे बजावले.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
पाहा व्हिडिओ